टाकळी हाजी : निमगाव दुडे तालुका शिरूर येथे विजेचा शॉक लागून दोन म्हशी मृत्यू मुखी पडल्याने शेतकरी रशिद शेख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले .परंतु या घटनेची माहिती मिळताच निमगाव दुडे येथील आदर्श सरपंच शशिकला अमोल घोडे यांनी तत्काळ दहा हजार रुपयांची मदत शेख कुटुंबाला रोख स्वरूपात देवू केली.
शेख यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.त्यांच्या दोन म्हशी अचानक ठार झालेने त्यांच्यावर खूप मोठा आर्थिक आघात झाला असल्याने सरपंच घोडे यांनी तत्काळ आर्थिक मदत देत आदर्श निर्माण केला आहे.वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्याने रस्त्याच्या कडेला विजेच्या तारा तुटून पडल्याने शेतकरी रशिद शेख यांच्या म्हशी मृत्यू पावल्या .पंचनामे झाले असून सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.या परिसरात वायरमन ची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सरपंच शशिकला घोडे,अमोल घोडे,चेअरमन शिवाजीराव घोडे यांनी केली आहे.वीज कर्मचारी वेळेला उपस्थित नसतात व अशा घटना घडतात अशी खंत निमगाव दूडे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फोटो