टाकळी हाजी : निमगाव दुडे ता शिरूर येथील रसिद गुलाब शेख या शेतकऱ्यांच्या दोन म्हशीना विजेच्या तारांनचा धक्का लागुन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . विद्युत वितरण कंपणीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असुन, विद्युत वितरण कंपनीने त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्रदादा गावडे यांनी केली आहे ‘
निमगाव दुडे ता शिरूर येथे गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे विजेच्या तारा व पोल निमगाव दुडे ते कवठे यमाई रस्त्यालगत पडलेले आहेत .विजेच्या तारा व खांब पडून देखील यामध्ये विजेचा प्रवाह अखंडपणे सुरूच होता, याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना माहिती देऊनही येथील वीज पुरवठा बंद करण्यात आलेल्या नव्हता असे अकुंश कांदळकर यांनी सांगितले . आज दुपारी रशीद शेख हे म्हशी चारण्यासाठी खंडोबा व पिराचे मंदीर या परिसरात गेले होते त्यांच्या म्हशी चारत असताना विजेच्या तारांच्या जवळ जाऊन तारांना स्पर्श झाल्याने तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने धक्का लागून दोन्हीही म्हशी जागीच ठार झाल्या .ही घटना कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याशी संपर्क विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे .तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सुचना तहशिलदार म्हस्के यांनी दिल्या आहेत . गेली आठ दिवसा पूर्वी वादळा मधे पोल पडुनही विद्युत पुरवठा बंद न केल्या बददल आश्चर्य व्यक्त केले जात आहे . निमगाव दुडे ते कवठे येमाई रस्त्यालगत हे पोल पडलेले असुन रात्री एखदी व्यक्ती न कळत येथुन गेली असती तर मोठी हानी झाली असती .
विद्युत वितरण कंपनीने या परिसरामध्ये त्वरित विजेचे पोल व तारा दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी राजेंद्र दादा गावडे यांनी केली आहे