मावळ्यानो आता लढायचं थांबायचं नाही – खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा निर्धार
कवठे येमाई येथे शिरूर तालुक्यातील ४२ गावाचा पार पडला मेळावा

टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) संपुर्ण देशामधे शिरूर लोकसभा मतदार संघ देशात तिसऱ्या क्रमांकावर असुन छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास आराखडा ,बैलगाडा शर्यत या सारखे महत्वाचे विषय मार्गी लावले असुन श्रेय घेणाऱ्यांनी मी खासदार होण्याच्या अगोधर येथील किती प्रश्नाना वाचा फोडीत मार्गी लावले असा सवाल संसंदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी करीत देशात सध्या महागाई, बेरोजगारी मुळे शेतकरी ,कामगार वर्ग संकटात असुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शना खाली परिवर्तन केल्या शिवाय शांत बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला .
कवठे येमाई ता शिरूर येथे बालाजी मंगल कार्यालयामधे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाचा पक्ष फुटीनंतर प्रथमचं मेळावा घेण्यात आला . या वेळी खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, भिमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम,माजी जिल्हा परीषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी उपसभापती बाळशिराम ढोमे,माजी पंचायत समितीचे सदस्या अरुणा घोडे ,माजी सरपंच दामुशेठ घोडे , राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, नाना फुलसुंदर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, संसदेमधे उत्कृष्ठ काम केल्यामुळे दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असुन हा पुरस्कार माझा नसुन येथील मायबाप जनतेचा आहे . खासदार म्हणुन संसदेमधे या भागातील पुणे नाशिक रेल्वे, पुणे नाशिक महामार्ग, पुणे नगर रस्ता, शिक्रापुर चाकण तळेगाव रस्ता या प्रलंबित विषया बरोबरचं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखडा मंजुर करीत निधीची तरतुद करण्यात आली त्यांच बरोबर येथील १० ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळावा म्हणुन इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आवाज उठवित प्रयत्न सुरु आहेत . तसेच बिबट्यांचा प्रश्न गेली १५ वर्षे उत्तर पुणे जिल्ह्यात भेडसावत असुन तो सोडविण्यासाठी प्रजनावर प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी प्रथमच संसदेत करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली . या पुढील काळात अधिक जोमाने काम करीत संपर्ग वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले .या वेळी देवदत्त निकम म्हणाले की, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यामुळे या तालुक्याचा विकास झाला असुन, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत . या उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमानात कांदा, टोमॅटो, दुधाचे उत्पादन होते या भागातील नेतेमंडळी सरकारमधे गेलेत मात्र त्यानंतर सरकारच्या कांदा निर्यात धोरणामुळे या भागातील शेतकरी वर्गाचे सुमारे अकराशे कोटीचे नुकसान झाले आहे तसेच टॉमेटो आयात केली, त्यात शेतकरी भरडला, आता दुधाचे बाजारभाव घटविले त्यात दर महिन्याल ३० कोटीचे नुकसान होत आहे याला जबाबदार तुम्ही नाहीत का सवाल करीत पक्ष सोडुन जाणाऱ्या नेत्यावर निकम यांनी टिका केली .मला आता कोणतेही पद दिले तरी माघारी जाणार नाही माझा लढा सुरुच राहील अशी ग्वाही निकम यांनी दिली .राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे म्हणाले की शरद पवार यांना सोडुन जाणाऱ्यांची अवस्था राजकारणात काय झाली हा इतिहास सर्व राज्यातील जनतेला माहीत असुन, भाजप जनतेचे शोषण करीत असुन सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यांची धमक फक्त शरद पवार यांच्या मधेच असुन त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमानात तरुण वर्गाचा पांठिबा मिळत आहे . वेळी आमदार अशोक पवार यांनी फोनद्वारे भाषण केले .माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सुर्यकांत पलांडे, शेखर पाचुंदकर, स्वप्निल गायकवाड यांची भाषणे झाली .