टाकळी हाजी : ( प्रतिनिधी ) : टाकळी हाजी येथील कुकडी प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या मिना शाखा कालवा शाखेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी वर्गाने अनेक वर्षानंतर स्नेह मेळाव्या निमित्ताने एक येत जुन्या आठवणीना उजाळा देत स्नेह जपण्यांचा प्रयत्न केला .
शिरूर जुन्नरला वरदान ठरणाऱ्या मिनाशाखा कालवा प्रकल्पाची ४० वर्षापुर्वी सुरवात झाली . त्या वेळेस टाकळी हाजी, जांबुत गावात प्रकल्पाच्या वसहाती उभ्या राहील्या . राज्यातील विविध भागातील अनेक कुंटुब अनेक वर्षे एकत्र राहीली, मुलांचा जन्म ते लग्ना पर्यन्तचा सर्व प्रवास या मातीत झाला मात्र सेवानिवृत्ती नंतर मुलांच्या नोकरीच्या ठिकानी तर काही मुळ गावी स्थिरावली . मात्र टाकळी हाजीच्या गोड आठवणी सदैव त्यांच्या मनात रुजल्या होत्या . येथील शाखेत शाखा अभियंता म्हणुन काम करीत सेवा निवृत्त झालेले नुरआलम शेख यांनी या कर्मचारी अधिकारी यांच्या मनातील भावना ओळखुन त्यांना एकत्र आणण्यांचा प्रयत्न केला . टाकळी हाजी येथील मळगंगा देवी या पर्यटन स्थळावर सर्व जन एकत्र जमले अनेक वर्षानंतर भेटल्यांने आपसुकचं अनेकांच्या डोळ्याच्या कडा पानवल्या होत्या . येथे मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणीना उजाळा दिला .
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे ,जुन्नर तालुक्याचे नेते तानाजी बेनके सेवानिवृत्त अधिकारी बी जे रहाणे, नुरआलम शेख, डी एस भालेराव,पी के पाटील, एस आर अहीरे, पी एस देठे ,किसनराव घोगरे, आर आर पाठक, सुधाकर साळवे, बी बी रासकर, एम बी भुजबळ, व्हि एस कांदळकर, के बी रासकर, मांडे रावसाहेब, जी एस पंडीत, बी एस कडु एम बी रासकर, बाळासाहेब वराळ यांच्यासह मोठ्या प्रमानात सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी उपस्थित होते .
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, या भागाच्या विकासात या सर्व लोकाचे मोलाचे योगदान असुन, सेवानिवृत्त झाले असले तरी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहु . या वेळी गावडे यांनी मिना शाखा कालव्यांच्या प्रारंभीच्या अनेक जुन्या आठवनीना उजाळा दिला .या वेळी तान्हाजी बेनके, नुरआलम शेख, बी जे रहाणे यांनी मनोगत व्यक्त केले . या वेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी गेली २३ वर्षे पाटबंधारे विभागाला सातत्यांने मदत करीत सहकार्ये केल्या बददल यांचा विशेष सन्मान सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी केला .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयवंत साळुंखे यांनी प्रस्ताविक नुरआलम शेख यांनी तर आभार संजय बारहाते यांनी मानले .