शिरूर : ( वृत्तसेवा ) : शिरूर पोलिसांनी ट्रान्सफार्मर चोरांच्या मुसक्या आवळल्या असुन आरोपीना जेरबंद केल्यामुळे नागरीकांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे .
शिरूर पोलीस ठाणे हददीतील बेट भागामध्ये लागोपाठ डीपी ( रोहीत्र) चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी लाईट ही आवश्यक गोष्ट असल्याने त्याच लाईट करीता असलेली डीपीची (रोहीत्र) चोरी होत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होते व त्याबाबत समाज माध्यमा मधून पोलीसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, पुणे ग्रा. यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्या अनुषगाने पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील तीन वेगवेगळे पथके तयार करून सतत त्या गुन्हयाचे तपासामध्ये सातत्य ठेवुन पोलीस पथकाच्या व गुप्तबातमीदारा मार्फत माहीती काढुन त्याच प्रमाणे रोहीत्र चोरी करणा-या टोळीच्या सतत मागावर राहून रोहीत चोरी करण्यात पटाईत असलेली टोळीतील सदस्य वेगवेगळया ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये १) बाळशीराम तुकाराम सुर्यवंशी वय ५५ वर्षे रा. बोरी शिरवली ता. जुन्नर जि. पुणे मुळ रा. पारगाव मीना घोड संगम ता. आंबेगाव जि. पुणे २) लहु बबन करंडे वय ३० वर्षे रा. काठापुर बु ता. आंबेगाव जि. पुणे ३) रविंद्र राघु सुकरे वय ३४ वर्षे रा. काठापुर बु ता. आंबेगाव जि. पुणे यांना ताब्यात घेउन त्यांचे कडे विश्वासात घेउन सखोल तपास करून त्यांचे कडुन एकुण १३ रोहीत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील आरोपीत यांचे मदतीने रोहीत्र मधील तांब्याच्या तारा विकत घेणारे १) आफताफ लालसा शेख वय ४१ वर्षे रा. मालवाडी ता. सिन्नर जि. नाशिक व २) शिवकुमार शिंदेसरीकुमार चौहाण वय २८ वर्षे रा. पारगाव ता. आंबेगाव जि. पुणे यांना ताब्यात घेउन त्यांचे कडुन गुन्हयातील गेला माला पैकी ३३० किलो वजनाची तांब्याच्या कॉईल व पटया असा एकुण २,३१,०००/- रू. चा माल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. यातील आरोपीत रामदास जाधव रा. काठापुर खुश ता. शिरूर जि. पुणे हा फरारी असुन त्याचा शोध घेणे चालु आहे. यातील आरोपीत यांचेकडे शिरूर पोलीस पुढिल अधिक तपास करीत आहेत.
वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयलअपर पोलीस अधिक्षक श्री. मितेश घटटे सेवा, पुणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत गवारी, शिरूर यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, शिरूर पोलीस ठाणे, सपोनि अमोल पन्हाळकर, पोसई सुनिल उगले, पोसई एकनाथ पाटील, सहा. फौजदार माणिक मांडगे, पोहवा उमेश भगत, पोना निलेश शिंदे, नाथा जगताप, विनोद मोरे, पो. कॉ. सुरेश नागलोत, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णु दहीफळे या टिमने केलेली आहे.