टाकळी हाजी : ( प्रतिनिधी ) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 2022/23च्या गळीत हंगामातील ऊस गाळपास सुमारे ३१०० रुपये बाजारभाव दिल्यामुळे शिरूर तालुक्यातील बेट भागासह पिंपरखेड परिसरातून शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे .
भीमाशंकर साखर कारखान्याच्या 2022/23 च्या गळीत हंगामातील उसाला कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी दिलेला २७५० रुपये व अंतिम हप्ता ३५० रुपये जाहीर केला त्यामुळे ऊस उत्पादकांना अपेक्षा पेक्षा जास्त बाजारभाव दिल्यामुळे ऊस उत्पादकांमधून पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे,सरपंच राजेंद्र दाभाडे,माजी सभापती बाळशीराम ढोमे, चेअरमन किरण ढोमे ,माजी सरपंच दामू दाभाडे, माजी सरपंच रामदास ढोमे,माजी सरपंच बिपीन थिटे, खरेदी विक्री संघाचे संचालक संपत पानमंद,भाऊसाहेब बोंबे, माजी सरपंच दिलीप बोंबे, अंकुश दाभाडे,बाळासाहेब बोंबे, किशोर दाभाडे, नरेश ढोमे, पोपट बोंबे,अप्पा गायकवाड, जयवंत बोंबे,उद्धव रोकडे, बाबुराव राक्षे, सुभाष घोडे तसेच काठापूर, चांडोह येथील ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.भीमाशंकर कारखाना परिसरातील शेतकरी हे कारखाना उभा राहील्यापासून सुजलाम – सुफलम झाला आहे. कारखाना यापूर्वी देखील चांगला बाजारभाव देत होता व यापुढे देखील चांगलाच बाजारभाव मिळणार असल्याचे सरपंच बिपीन थिटे व संपत पानमंद यांनी सांगितले
प्रतिक्रिया -भीमाशंकर साखर कारखाना हा एकमेव कारखाना असा आहे की, कार्यक्षेत्रातील ऊस व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस या दोन्ही सभासदांना सारखाच बाजारभाव देत आहे.मात्र जिल्ह्यातील काही जादा भाव देणारे कारखाने हे कार्यक्षेत्रातील उसालाच जाहीर केलेला बाजारभाव देतात. कार्यक्षेत्राबाहेरील उसाला कमी दर बाजारभाव देतात. परंतु भीमाशंकर कारखाना असा कुठलाही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान बाजार भाव देत आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिने खूप चांगली बाब आहे , कारण भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ ७५ टक्के ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरील आहे. हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.
रामदास ढोमे माजी उपसरपंच पिंपरखेड
चांगल्या नेतृत्वामुळेच चांगला भाव – शेतकरी नेते रखमाशेठ निचित
भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यांला दिलीपराव वळसे पाटील यांच्या सारखे सक्षम नेतृत्व मिळाले आहे . त्यामुळे अंत्यत पारदर्शी कारभार होत असुन , दरवर्षी भिमाशंकर उसाला चांगलाच भाव देत आहे . या वर्षी तर विक्रम केला आहे . परंतु काही लोकाना काविळ झाली असुन ते नाहक टिका करीत आहेत त्यांनी स्वतःच्या तालुक्यातील कारखाण्याकडे लक्ष दयावे असे श्री रखमाशेठ निचित यांनी भिमाशंकरवर टिका करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्याला सुनावले .