पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

भाजपने जनतेचा भ्रमनिराश केलाय – माजी मंत्री महादेव जानकर

सरकार डायरेक्ट वशिल्यांने कलेक्टरचं पद देतंय - स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या गरीबाच्या पोरानं करायचं काय?

शिरूर (प्रतिनिधी ) : काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही जनतेचा भ्रमनिराश केला असुन, शेतकऱ्यांच्या कांद्यासह इतर प्रश्न, वाढलेली बेरोजगारी महागाई या कडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देत नाहीत त्यामुळे जनता त्यांना जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, अशी टिका राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली .
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाने दोन दिवसांची जनस्वराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . दुसऱ्या दिवसी शिरूर हवेली मतदार संघातील अनेक गावामधुन या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले .त्या वेळेस न्हावरे ता शिरूर येथे सांगता सभा झाली तेथे महादेव जानकर बोलत होते . या वेळी राष्ट्रीय महासचिव सुशिल कुमार पाल, राष्टीय संघटक गोविद सुरनर, प्रदेश महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र रासपाचे अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनिल बंडगर, समन्वयक सचिन गुरव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, अहमदनगर जिल्हा महीला अध्यक्षा सुवर्णा जरहाड पाटील,रासपा अनु जाती जमाती सेलचे अध्यक्ष गणेश लोंढे, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तान्हाजी शिंगाडे, रासपाचे नेते रामकृष्ण बिडगर,हवेली रासपा तालुका अध्यक्ष भरत गडदे, शिरूर तालुका अध्यक शिवाजी कुरहाडे, पुणे शहर महीला अध्यक्षा सुनिता किरवे, शिरूर तालुका महीला अध्यक्ष चेतना पिंगळे, प्रभाकर जांभळकर यांच्यासह मोठ्या प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते .
या वेळी महादेव जानकर म्हणाले की, ज्या शाहु महाराजांनी या देशात प्रथम आरक्षण धोरण लागु केले त्यांच्याच मराठा समाजाला आज आरक्षणासाठी लढावे लागत आहे . मुख्यमंत्री पदापासुन सर्व सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या मराठा समाजातील राजकारणी लोकानी गरीब मराठा माणसांचा कधी विचार केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . मराठा धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे . मात्र नोकरीत खाजगीकरण करण्यांचे धोरण केंद्र सरकार आखत असुन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीला कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट कलेक्टर केल मग आमच्या गरीबांच्या मुलांनी रात्रदिवस अभ्यास करून काय उपयोग असा सवाल करीत हे सरकार धनदांडग्याचे असुन यांना यांची जागा दाखऊन देताना राष्ट्रीय समाज पक्षाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले .राष्ट्रीय समाज पक्षामध्ये कोणत्याही प्रस्थापित नेत्याचा पक्ष नाही . येथे सर्वसामान्य घरातील तरुणाला संधी दिली जात असून सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा हा पक्ष असल्यामुळे सर्वांनी पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभे रहा तुमचे प्रश्न निश्चित ठरवले जातील असे आश्वासन यावेळेस महादेव जानकर यांनी दिले .
शिरूर, हवेली ,आंबेगाव तालुक्यामध्ये गाव गाव मधून राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी महिला व तरुणांनी जन स्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत केले .त्यामुळे जानकर कोणाचे टेन्शन वाढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page