कृषीक्रीडापर्यटनपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईसामाजिक

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर वाय पाटील यांचा उल्लेखनिय कार्याबदद्ल राज्य शासनाकडुन उदया होणार सन्मान

उदया अभियंता दिना निमित्ताने मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान सोहळा

शिरूर : ( प्रतिनिधी ) सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( उत्तर ) कार्यक्षम कार्यकारी अभियंता श्री  रावबहादूर यशवंत पाटील यांना महाराट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनिय कार्ये केल्या बद्द्ल सन २०२३ चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला असुन, शुक्रवार दिनांक १५ सप्टेबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे .
शेतकरी कुंटुबातील पाटील यांचे पदविका शासकीय तंत्रनिकेतन सोलापुर,पदवी के आयटी कोल्हापूर व पदव्युतर शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय कराड येथून पूर्ण केले आहे. श्री पाटील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सन २००० मधे सहायक अभियंता श्रेणी-2 या पदावर रुजू झालेले आहेत . तर सन २०१६ पासून कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे. आंबेगाव मधील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज ( अवसरी ) ग्रामीण रुग्णालय, मंचर , आदिवासी आश्रमशाळा, वस्तीगृह बांधकाम, भिमाशंकर विकास आराखडा, डिंबे येथील भिमाशंकर उद्यान, घोडनदीवरील अनेक पुलांचे कामे केली .जुन्नर तालुक्या शिवनेरी विकास आराखडा, ओतूर ग्रामीण रुग्णालय, मावळ मधील लोणावळा उपजिल्हा रुग्नालय, कान्हे ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ प्रशासकीय इमारत ,टाकवे, आंबी मोठ्या पुलांचे कामे, बांधकाम खेड तालुक्यात राजगुरू स्मारक विकास आराखडा केला . शिरूर तालुक्यात जगप्रसिद्ध रांजणखळगे पर्यटन विकास आराखडा, ग्रामिण रुग्नालये यासह घोडनदीवरील पुलांचे बांधकाम करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे . सन २०१६ ते २०१२ मध्ये प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पुणे जिल्यातील अनेक वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे कामे केले आहेत .

सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना पाटील यांनी महत्वाचे प्रकल्प पुर्ण करण्यात मोठे योगदान दिलेले आहे . त्यांना उदया १५ सप्टेबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणविस , सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थित उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार मुंबई येथे देण्यात येणार आहे .
पाटील यांना पुरस्कार मिळाल्या बदद्ल त्यांचे अभिनंदन सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार दिलीपराव मोहीते पाटील, आमदार सुनिल शेळके, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटरावजी गावडे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष पाडुरंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बी एन बहीर यांनी केले आहे .
सोलापुर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी या खेडेगावात जन्मलेले रावबहादुर पाटील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुणे जिल्हयात बांधकाम खात्यात काम करताना उल्लेखनिय काम केले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page