शिरूर: ( प्रतिनिधी ) : जांबुत ता शिरूर जि पुणे येथील बांधकाम व्यवसायिक लियाकत मंडल अपहरण व खंडणी प्रकरणात चार जनांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी यातील खऱ्या मास्टर माईंडला मात्र लाखोची लक्ष्मी कृपा करून अभय दिला जात असल्याची चर्चा आहे .
या मास्टर माईंडला पोलिस गजाआड करणार का ? असा प्रश्न सामान्य नागरीकांमधुन व्यक्त केला जात आहे . माजी गृहमंत्री व सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात राहणारा बांधकाम व्यवसायिक लियाकत मंडल याला २ सप्टेंबर रोजी पिंपरखेड येथुन सराईत गुन्हेगार अंकुर पाबळे, आण्णा माकर, माऊली पाबळे व इतर एक असे चार जनांनी अपहरण करीत स्विफ्ट गाडीत घालुन फाकटे शिवारात एका बंद घराजवळ आणुन जबर मारहान करीत पिस्तुचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी वसुल केली तर दहा लाखांचा हप्ता ठरून घेतला होता . या घटनेमुळे शिरूर – आंबेगाव जुन्नर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे .
शिरूर तालुक्यात बेटभाग सधन असा भाग असुन या परीसरात मोठ्या प्रमानात शेतकरी नवीन बंगले बांधीत आहेत . जांबुत ( पंचतळे ) हा भाग ज शिरूर तालुक्यात असला तरी जुन्नर आंबेगाव तालुक्याला लागुन असुन मोठी व्यापारी पेठ झाली आहे . या भागात निरगुडसर येथील लियाकत मंडल हे अनेक वर्षापासुन बांधकामाचे कामे करीत आहेत . त्यांच्या सारखे अनेक ठेकेदारही कामे करीत आहेत ,मात्र कमी व माफक दरात मंडल कामे घेत असल्यामुळे येथील शेतकरी वर्गात तो लोकप्रिय झाला होता . त्यामुळे स्थानिक ठेकेदार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे . त्यातुनचं व्यवसायिक स्पर्धेतुन लियाकतचा काटा काढण्याचा डाव आखला गेल्याची चर्चा आहे .
याबाबत पोलिसांना माहीती असुनही अधिकारी वर्ग लक्ष्मीकृपेमुळे मुख्य सुत्रधारांला अभय देण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे तपासाची दिसा बदलविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे . खाकी कडुन अभय मिळत असल्यांने अनेक तरुण गुन्हेगारी कडे वळले असुन, सर्वसामान्य माणसाला जगणे मात्र अवघड झाले आहे . रविराज ईसवे खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी दहा महीने मोकाट गावात फिरत होता ,मात्र त्याला पोलिसांनी अटक केली नाही . त्यानंतर लियाकत मंडल खंडणी प्रकरण झाले . त्यावेळेस रविराज ईसवे प्रकरणातील चार आरोपी अटक केले . मात्र मंडल प्रकरणातील सराईत गुन्हेगार बारा दिवस झाले तरी आरोपी मोकाट असुन, त्यांना अभय देण्यासाठी काही पंटर मदत करीत आहेत . आरोपी मोकाट असल्याने जांबुत फाकटे पिंपरखेड चांडोह परीसरात सामान्य माणुस धास्तावला आहे .
या आरोपीनी अनेकांना मारहान करीत खंडणी वसुल केल्याची कुजबुज लोक करीत आहेत, मात्र स्थानिक पोलिसा बदद्ल सामान्य जनतेमधे विश्वासहर्ता उरली नाही .खाकीतील काही अधिकारी , त्यांचे पंटर व गुन्हेगार यांच्यात उठबस असल्याने आपले नाव माहीत झाले तर आपलाचं गेम होईल या भितीमुळे गुन्हा दाखल करण्यास कोणी पुढे येत नसल्यांचे चित्र आहे .
गुन्हेगारांचा बंदोबस्त करणार :-
या भागातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे उपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले .