कृषीक्रीडागुन्हेपर्यटनपुणेपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

माजी गृहमंत्र्यांच्याच गावातील ठेकेदारांचे अपहरण करून पिस्तुलचा धाक दाखवित बेदम मारहान करीत लाखांची खंडणी वसुल,

शनिवारी रात्री घटना घडुनही माध्यमांना माहीती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

टाकळी हाजी : ( प्रतिनिधी ) : एका बांधकाम ठेकेदारांचे अपहरण करून त्यांला पिस्तुल दाखवित जिवे मारण्यांची धमकी देत एक लाखाची खंडणी उकळल्यांची खळबळजनक घटना पिंपरखेड परीसरात शनिवारी घडल्यांने बेट भागातील व्यवसायिकासह सामान्य वर्गात दहशत निर्माण झाली आहे .
या बाबत मिळालेली माहीती अशी की, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या गावात राहत असलेले लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ रा निरगुडसर ता आंबेगाव हे बांधकाम ठेकेदार असुन जांबुत परीसरातील लोकाच्या घरांचे कामे मजुरीवर करून देण्याचा व्यवसाय करतात . शनिवारी सांयकाळी साडेचार वाजण्यांच्या सुमारास ते पिंपरखेड वरून काठापुरच्या दिशेने मोटार सायकलवरून जात असताना एका विना नंबरच्या स्विफ्ट कारमधुन आलेल्या चार जनांनी त्याला आडऊन गाडीत बसविले . त्याला मारहान करीत गाडी फाकटे शिवारात एका निर्जन बंद घराजवळ त्याला घेऊन जाऊन जबर मारहान केली . आम्हाला दहा लाख रुपये दे नाहीतर तुला गोळ्या घातलो असा दम दिला . त्यानंतर घाबरलेल्या मंडल यांनी निरगुडसर येथे पत्नीला फोन करून काहीही करून एक लाख रुपये गोळा करून मुलाला पाठऊन दे, अर्जेंट आहे असे सांगितले . त्यांचा मुलगा एक लाख रुपये घेऊन आला . त्यालाही पिस्तुला धाक दाखवित जर कुणाला सांगितले तर गोळ्या घालु असा दम दिला आहे . दहा लाखा पैकी एक लाख रुपये दिले उर्वरीत रक्कम पुढील आठवड्यात दोन लाख रुपये हफ्त्याने जमा करा असा धम देत बेदम मारहान केली आहे . या घटनेमधे मंडल यांचा हात मोडला आहे . त्यांना पारगाव येथील हॉस्पिटल मधे उपचार सुरु आहे
पिंपरखेड येथील महाराष्ट्र बॅक लुटीचा प्रकार गेल्या दिड वर्षापुर्वी घडला होता . त्यातील काही सराईत आरोपीची दहशत जांबुत पंचतळे परीसरात मोठ्या प्रमानात असुन, लोकाना अडविणे दम देणे पैसे उकळणे हे प्रकार सर्रास घडत आहेत मात्र सामान्य माणुस दहशतीमुळे तक्रार देण्यास पुढे येत नसल्यांची चर्चा आहे . येथुन शिरूर पोलिस स्टेशन ५० कि मी अंतरावर असल्याने सामान्य माणसाला मदत मिळणे अवघड झाले आहेत . अनेक गंभीर गुन्ह्यात जामीन झाल्यावर आरोपीवर स्थानिक पोलिसांनी लक्ष ठेवण्यांची गरज आहे . या भागात राजरोस अवैध दारू व इतर धंदे सुरु आहेत,मात्र खाकीच्या आर्शिवादामुळे अवैध धंद्यामधुन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असुन, सामान्य जनता हतबल झाली आहे .हि घटना शनिवारी रात्री घडुनही पोलिस मात्र पत्रकारांना माहीती देण्यास टाळाटाळ करीत असुन येथील चौकीचे अधिकारी यांना या बाबत विचारले असता माहीती सांगतो देतो म्हणत टाळाटाळ करण्यात आली . हे अधिकारी खंडणी खोर गुन्हेगारांना तर पाठीशी घालत नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे . यांच्यावर एस पी अंकीत गोयल काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page