शिरूर (प्रतिनिधी ) : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी गेली तेविस वर्षे पत्रकारीता करीत असताना सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्यांचे काम करीत विधायक पत्रकारीता केली . कोविड काळात सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धाऊन जात राज्यात आदर्श काम उभे केले, असे प्रतिपादन शिरूरचे माजी आमदार पोपटरावजी गावडे यांनी केले.
शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री संजय बारहाते यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल निमगाव दुडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता . यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे, माजी सरपंच दीपक दुडे, उपसरपंच शहाजी पवार ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील पानगे, भाऊसाहेब दुडे,अशोकराव खडसे ,मुख्याध्यापक शांताराम पवार, राहुल घोडे सर काळे सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पानगे, विशाल रावडे , शशिकांत सदाफुले,अरुण पानगे, सचिन पानगे,दत्तात्रय पानगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी माजी आमदार पोपटरावजी गावडे म्हणाले की, संजय बारहाते यांनी तेवीस वर्षांपूर्वी पत्रकारिता करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भागातील प्रश्न लोकमत मधे मांडत त्यांना शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले . पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षापासून काम करताना सामाजिक त्यांनी प्रश्नाची जाण ठेवत वेळोवेळी विविध उपक्रम राबवीत सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे काम त्यांनी केले ,म्हणून त्यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे .
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे म्हणाले की ,पत्रकार संजय बारहाते यांनी कोविड काळात केलेले काम जनता कधीही विसरू शकत नाही . पत्रकार बांधवांना संघटित करून सदैव मदतीला तत्पर असणारे हे नेतृत्व स्व कर्तृत्वामुळे तालुका स्तरावर उत्तम प्रकारे काम करीत आहे याचा अभिमाना सर्वांना आहे . शशिकांत सदाफुले यांचा ग्रामपंचायत कामगार संघटनेवर निवड झाल्या बदद्ल त्यांचा सन्मान करण्यात आला .
या वेळी दिपक दुडे ,विशाल रावडे यांचे भाषणे झाली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक शांताराम पवार तर सुत्रसंचालन राहुल घोडे सर तर आभार काळे गुरुजी यांनी मानले .