पुणे (प्रतिनिधी ): राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन पुण्यात मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी गणेश कला क्रिडा मंच स्वारगेट येथे होणार असुन त्यांची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहीती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते ,महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली .
प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने देशभर संघटन वाढीवर भर दिला असून येणाऱ्या जिल्हा परीषद ,पंचायत समिती नगरपालिका ,महानगरपालिका ,लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु आहे .महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने जनसुराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून म्हाडा, अहमदनगर दक्षिण ,परभणी ,सांगली ,मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसुराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे .दिनांक २८ ऑगस्ट रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातून जनसुराज्य यात्रा काढण्यात येणार असून , इंदापुर दौंड बारामती , पुरंदर , पुण्यात कात्रज ,चांदणी चौक , वाकड, निगडी , पिंपरी विद्यापीठ , बालगंधर्व चौक मार्गे दिनांक 29 रोजी दुपारी ही यात्रा स्वारगेट येथे वर्धापन दिन महामेळाव्यात सहभागी होणार आहे .राज्यभरातून लाखो लोक येणार असून त्यासाठी जिल्हा व तालुका निहाय नियोजन सुरू आहे . राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी मुळे या मेळाव्याच्या निमित्ताने महादेव जानकर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे .