टाकळी हाजी : वडनेर ( ता.शिरूर ) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (रा. मुंबई, वय २२) या तरुणाचा धारदार हत्यार आणि कुऱ्हाडीने हल्ला करुन खून करण्यात आल्यांची खळबळजनक घटना काल घडली .
शाहिद शरीफ बागवान असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली. वडनेर- फाकटे रोडवर वडनेर हद्दीत जाकिर सय्यद (मुंबई) यांनी वर्षभरापूर्वी येथे जमीन घेतली असून देखाभालीसाठी त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताउल्ला उर्फ मोईन वडनेर येथे राहत होता. त्यांच्याकडे कामासाठी आलेला शाहिद शरीफ बागवान (भुसावळ, जि. जळगाव) त्याच्यासोबत राहत होता. खून करण्यापूर्वी शाहिद याने रहात असलेल्या ठिकाणच्या सात खोल्यांची दारे बंद करून सर्वात आतील खोलीत कुऱ्हाडीने मानेवर वार करीत तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यां मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरिक्षक सुनील उगले, पोलीस अंमलदार दिपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नागरीकामधे मोठी खळबळ माजली असुन, टाकळी हाजी पोलिस चौकी अंतर्गत क्षेत्रात विविध कामासाठी मोठया प्रमानात परप्रांतीय मजुर येत आहेत . त्यांची कोणत्याही स्वरुपाची माहीती उपलब्ध नसते . त्यामधे अनेक गुन्हेगारी करणारे लोक वावरत असल्यांची चर्चा आहे . ग्रामपंचायत पोलिस स्टेशन मधे गावात आलेल्या परप्रांतीय नागरीकांचे आधार कार्ड सह संपुर्ण माहीती देणे आवश्यक आहे .