पुणेपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रराजकारणशैक्षणिकसामाजिक
शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संजय बारहाते यांची एकमताने फेरनिवड
रांजणगाव गणपती ( पिनॅकल सिटी ) येथे पार पडली बैठक
शिरूर : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय बारहाते यांची पुन्हा एकमताने अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली .
आज पिनॅकल सिटी, रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष शरदराव पाबळे ,यांच्या शासकीय पत्रकार अधिस्विकृती समितीवर निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर होते. यावेळी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुनील वाळुंज , समन्वयक पोपटराव पाचंगे, शहराध्यक्ष दिपाली काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम केले असून त्यांची पुन्हा फेरनिवड करण्यात यावी अशी सुचना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर यांनी मांडली . त्याला उपस्थित पत्रकार पोपटराव पाचंगे ,तुकाराम पठारे यांनी अनुमोदन दिले . या निवडीचे उपस्थित सर्वानी टाळ्या वाजुन स्वागत केले . या वेळी मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख म्हणाले की , शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर संजय बारहाते यांनी कोविड मधे एक हात मदतीचा उपक्रम राबविला त्याची राज्यात चर्चा झाली . त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित संघटना तळागाळापर्यन्त पोहचविण्यांचे काम केले आहे . राज्यांचे अध्यक्ष शरद पाबळे म्हणाले की, उत्तम संघटक सामाजिक कार्यात झोकुन देत काम करण्यांची संजय बारहाते यांची वृत्ती असुन, संघटनेसाठी या पुढेही ते अधिक जोमाने काम करतील . पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुनिल वाळुंज यांनी अभिनंदन केले . पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर म्हणाले की नवीन संकल्प पुर्ती साठी अध्यक्ष म्हणुन संजय बारहाते चांगले काम करतील असा विश्वास आहे, त्यामुळे सर्वानुमते त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे .या वेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार मदन काळे माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी प्रस्ताविक केले तर जेष्ठ पत्रकार सतिश धुमाळ यांनी सुत्रसंचालन केले समन्वयक पोपटराव पांचगे यांनी आभार मानले . अध्यक्षपदी पुन्हा संधी देत विश्वास दाखविल्या बदद्ल अध्यक्ष संजय बारहाते यांनी सर्वाचे ऋण व्यक्त करीत शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ राज्यात आदर्श पत्रकार संघ करण्यांचा संकल्प व्यक्त केला .