पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

पुणे जिल्ह्यात मेरी मिट्टी मेरा देश अभियान प्रत्येक गावात सुरु –

हर घर तिरंगा फडणार मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

शिरूर (प्रतिनिधी ) आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले असुन ,त्यानूसार सदर कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अभियान प्रत्येक गावात राबविण्यात येणार असल्यांची माहीती पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) विजयसिंह नलावडे यांनी दिली आहे .

या बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले की ,आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी या उददेशाने हे अभियान राबविणे आवश्यक आहे. या अभियाना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देणे अभिप्रेत आहे. तरी या कार्यक्रमांकरीता पुढील प्रमाणे वेळापत्रक देणेत येत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर दिनांक ९ ऑगष्ट पासुन सुरु झाले असुन दि १४ ऑगस्ट २०२३ यादरम्यान शिलाफलक , वसुधा वंदन, स्वांतत्र सैनिक विरांना वंदन, पंचप्रण (शपथ घेणे )
, माती कलशामधे गोळा करने, हे उपक्रम राबविण्यात यावे .
त्यांच प्रमाने दि १३ ऑगस्ट ते १५ ऑगष्ट पर्यन्त हर घर तिरंगा हे मागिल वर्षी प्रमाने याही वर्षी राबविण्यात येणार आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page