पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

शासकीय जागेवर जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकार भवन उभारावे – आ महादेव जानकर

आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत केली मागणी

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून सरकारने पत्रकार भवन बांधुन देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य महादेव जानकर यांनी विधान परिषदे मध्ये केली .
याबाबत आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेमधे लक्षवेधीची सूचना मांडली .यावेळी उपसभापती नीलम गोर्हे यांनी याला शासनाच्या वतीने उत्तर देण्याच्या सूचना मंत्री दीपक केसरकर यांना दिल्या . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले की,सरकार यासाठी सरकार प्रयत्नशिल असुन या बाबत अहवाल मागविण्यात येईल .
माजी मंत्री व विधान परिषद सदस्य महादेव जानकर म्हणाले की, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये अनेक वृत्तपत्रे व इलेट्रकॉनिक माध्यमा मध्ये हजारो तुटपुंज्या मानधनावर पत्रकार अविरत काम करत आहेत . खेड्यापाड्यातील प्रश्न मांडण्यासाठी जीवाची पर्वा न करता महत्त्वाची भूमिका पत्रकारांनी निपक्षपणे सदैव केली असून, त्यांचा देशाच्या व राज्याच्या विकासाच्या मध्ये महत्त्वाचा वाटा आहे . सर्वांना विकासाची दिशा देणारा पत्रकार हा घटक मात्र स्वतःच्याच मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे ठिकठिकाणी नाराजी व्यक्त करत आहे. पत्रकारांना किमान जिल्हा व तालुका स्तरावर एकत्र जमण्यासाठी हक्काचे पत्रकार भवन प्रेस क्लब होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .शासनाच्या अनेक जागा धुळखात पडून असून त्याच्यावर अनेकांनी अतिक्रमण केलेले आहेत .अशा जागा शोधून शासनाने तालुका व जिल्हा स्तरावर पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण केल्यास पत्रकार व जनतेच्या हिताचा निर्णय होणार आहे. तरी शासनाने नागपूर प्रमाने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व जिल्हा पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधून द्यावे अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे .
.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page