पुणेमहाराष्ट्रराजकारणसामाजिक

वंचीत घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यांचे महादेव जानकर करीत असलेले कार्ये कौतुकास्पद – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतले आण्णाचे आर्शिवाद

पारनेर (वृत्तसेवा ) : माजी मंत्री महादेव जानकर हे कौंटुबिक सुखाचा त्याग करीत राष्ट्र हेच माझे कुंटुब आहे असे समजुन राज्यात व देशात वंचित घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केले .
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये जन स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीगोंदा येथुन सुरू झालेली जनस्वराज्य यात्रा पारनेर तालुक्यात बेलवंडी फाटा येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले . त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले .यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते ,प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर ,प्रदेश सरचिटणीस रवींद्र कोठारी, पश्चिम महाराष्ट्र युवकाध्यक्ष अजित पाटील , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर,अहमदनगर जिल्हा रासपा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, अहमदनगर महिला अध्यक्ष सुवर्णाताई जराड, सरपंच लाभेश औटी , समन्वयक सचिन गुरव,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते शिरूर सपाचे अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णा हजारे यावेळेस म्हणाले की ,लोकशाही बळकट होण्यासाठी राजकीय प्रवाहाच्या बाहेर असलेल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे मात्र सध्या राज्यात व देशात ठरावी घराण्यांनाच व त्यांच्या वारसांना प्रतिनिधित्व दिले जाते . महादेव जानकर हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असून देशात व राज्यात वंचित घटकासाठी करीत असलेले कार्य ते लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे .
यावेळी महादेव जानकर म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिल यासाठी प्राणाची बाजी लावत देशातील जनतेला आपल्या न्याय हक्कासाठी एक क्रांतिकारी शस्त्र हातात दिले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत असून ,मंत्री आमदार होण्यापेक्षा अण्णासाहेब हजारे यांच्यासारखे थोर समाजसेवक निश्चितच देशाचे चित्र बदलणांचे कार्य केले आहे . हजारे हे तरुणांसाठी आदर्श व प्रेरणादायी असून त्यांच्याच रूपाने या देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी आहेत .
लोकपाल बिल विधान परिषदेमध्ये मांडून त्याला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली . त्यावेळेस याबाबत विधान परिषदेमध्ये हे बिल मांडण्याचे आश्वासन माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिले .,

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page