गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईसामाजिक

शिरूर पोलिसांची दबंग कामगिरी, दोन सराईत टोळया केल्या जेरबंद

मोटार सायकली, शेती पंपासह बंधाऱ्याचे ढापे चोरणारे गजाआड

टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : पुणे जिल्हयातील शिरूर पोलीस स्टेशनकडुन बंधा-यावरील लोखंडी ढाप्यांची दरोडा घालून चोरी करणारी संगमनेर ता अहमदनगर येथील भंगारवाल्या सह व मोटार सायकल व शेती मोटार पंप चोरी करणारी ( कवठे येमाई ता शिरूर ) येथील दोन टोळया केल्या जेरबंद करण्यात यश आले आहे . त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे .

या बाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार दि.१७ जुन २०२३ रोजी मध्य रात्री ०२.३० वा सुमारास मौजे वडनेर खुर्द, ता. शिरूर जि. पुणे येथील ग्रामस्थ नाथा शंकर निचीत यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक धनंजय थेऊरकर यांना फोनद्वारे “त्यांचे राहते घराजवळ ठेवलेले बंधा-याचे ६२ लोंखडी ढापे हे कामगार संतोष थोरे यास ५ आरोपीनी चाकुचा धाक दाखवुन बळजरीने दरोडा घालुन आयशर टेम्पो व पिकअप वाहनातुन चोरी करून नेले आहे” असे कळविलेनंतर चोरीस गेलेले लोखंडी ढापे व त्यांचेकडील आयशर टेम्पो व पिकअप जिपचा शोध घेत असताना पोलीस पथक पंचतळे ते जांबुत रोडने वडनेर खुर्द कडे येत असताना पोलीसांना पाहुन चोरटयांनी आयशर कंपनीचा टेम्पो जांबुत गावचे हददीत ब्रिटानिया डेअरीसमोर उभा केला तेव्हा त्यामधील ३ चोरटे पळुन गेले त्यावेळी पोलीसांनी व ग्रामस्थांनी मिळुन आयशर टेम्पोचा डायव्हर गोरक्षनाथ अंबादास गोंड रा. सिन्नर जि.नाशिक यास शिताफीने पकडले. तेंव्हा त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये ४९ लोखंडी ढापे मिळुन आले. आयशर टेम्पो डायव्हरकडे पळुन गेलेल्या त्याचे साथीदारांबाबत विचारपुस करून त्याचे कडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे वडनेर- जांबुत – पंचतळे रोडने पोलीस पथक, पोलीस मित्र व ग्रामस्थांनी सदर पिकअप जिपचा पाठलाग करून पिकअप जिप ही जांबुत ब्रिटानिया डेअरीपासुन १ कि.मी अंतरावर वडनेर- जांबुत – पंचतळे रोडला पकडली पिकअप ड्रायव्हर पोलीसांनी ताब्यात घेतला. त्याचे पिकअप जिपची मध्ये एकुण १३ लोखंडीढापे मिळुन आले आहेत. असे एकुण ६२ ढापे आयशर टेम्पो नं. एम.एच.१५ डी.के. ०५४५ व पिकअप जीप नं. एम.एच.१४ जे. एल. २९१५ यामधुन जप्त करण्यात आलेले आहेत.

सदर प्रकरणातील पळुन गेलेले ३ आरोपीतांचा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल (भा. पो.से.), अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश गुट्टेव उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पो.नि.सुरेशकुमार राऊत शिरूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली टाकळीहाजी पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलीस पथकाने शोध घेवुन सिन्नर, नाशिक येथुन सापळा लावुन आरोपीत यांना ताब्यात घेवुन त्यांना जेरबंद करण्यात आलेले आहे.

या . गुन्हयामध्ये यातील आरोपी १) गोरक्षनाथ अंबादास गोंडे रा. पाटपिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक (आयशर टेम्पो ड्रायव्हर) २)संजय यादव ३) प्रकाश धोंडीबा गावडे रा. तुगाव, ता. आंबेगाव जि. पुणे (पिकअप डायव्हर) ४) अजयकुमार दुखी मौर्य रा.अॅन्ट आफ हिल, मुंबई सध्या रा. सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक ५) विरेंद्रकुमार केसरीप्रसाद सोनी रा. सिन्नर, ता.सिन्नर, जि. नाशिक यांना अटक करण्यात आली असुन आरोपींकडुन दरोडा टाकुन चोरी केलेले एकुण ६२ लोखंडी ढापे कि.रू पाच लाख २७, हजार व वरीलप्रमाणे गुन्हा करण्याकरीता वापरलेला आयशर टेम्पो कि. आठ लाख किमतीचा व पिकअप जिप पाच लाख रूपये किमतीची असा एकुण १८ लाख- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त आरोपीतांना अटक करून मे.कोटी समक्ष हजर केले असता मे.शिरूर कोर्ट यांनी आरोपीना दि.२०/६ / २०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करीत आहेत.

त्याचप्रमाणे शिरूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही काळात झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्याचे दृष्टीने शिरूर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलचा शोध घेणे चालु असतानाच पोलीस उपनिरीक्षक श्री. एकनाथ पाटील व त्यांचे पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन, देवानंद विलास धवसे रा. कवठे यमाई ता. शिरूर, जि.पुणे व त्याचे इतर ५ साथीदार यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार अनिकेत आनंदा आव्हाळे रा. कवठे यमाई ता. शिरूर, जि. पुणे याचे व इतर ४ अल्पवयीन साथीदार यांचे मदतीने शिरूर शहर तसेच शिरूर पोस्टे हददीत मोटारसायकल चोरी केलेची कबुली देवुन त्यांचकडुन एकुण ८ मोटारसायकल त्यामध्ये ५ हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल व १ होन्डा कंपनीची शाईन मोटर सायकल, तसेच १ होन्डा कंपनीची सी.डी. डिलक्स मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपी देवानंद विलास धवसे याने त्याचे ४ अल्पवयीन साथीदारां मार्फत शिरूर शहर, आण्णापुर, आमदाबाद या ठिकाणावरून विदयुत शेती पंप चोरी केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण ३ विदयुत शेतीपंप हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रमाणे एकुण ८ मोटारसायकल व ३ विदयुत शेतीपंप मिळुन सुमारे २ लाख ३०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे मो. सायकलचे पार्ट भंगार मध्ये विकत घेणारा आरोपीत यास ही ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर गुन्हयांतील आरोपी १) देवानंद विलास धवसे रा. गांजेवाडी कवठेयमाई ता. शिरूर जि. पुणे २) अनिकेत आनंदा आवाळे रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे ३) मजहर अकबरअल्ली हुसेन रा. अमदाबाद ता. शिरूर जि. पुणे यांना अटक करून त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले असता मे न्यायालयाने सदर आरोपीतांची दि. १९/०६/ २०२३ रोजीपर्यंतची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक – नाथसाहेब जगताप करीत आहेत. अश्या प्रकारे दोन टोळयातील एकुण ८ आरोपीत यांना अटक करून त्यांचे कडुन एकुण कि रू. २०,५७,०००/- रू चा माल हस्तगत केला आहे.

या आरोपीत यांचे कडुन शिरूर पोलीस ठाणे दोन मोटरसायकल चोरीचे तसेच मोटार चोरीचे दोन गुन्हे, राजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मो. सायकल चोरीचे दोन गुन्हे, तळेगाव दाभाडे पो.स्टे. एक मो. सायकल चोरीचा असे गुन्हे पोलीस पथकाने उघडकीस आणले असुन आणखी पोलीस त्या आरोपीत यांचे कडे तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण श्री अंकित गोयल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग मितेश गुट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग यशवंत गवारी, पो.नि.सुरेशकुमार राऊत शिरूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक.अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहा फौजदार माणिक मांडगे, पोलीस नाईक धनंजय थेउरकर, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विनोद काळे, रघुनाथ हळनोर, विशाल पालवे यांनी केली असुन त्याकामी पोलीस मित्र व ग्रामस्थ वडनेर खुर्द यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

 

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page