पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

राज्यातील बड्या नेत्यांना आम्ही थांबविले तर पारनेचा नेता आमच्या पुढे किरकोळ आहे – खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचा इशारा

पारनेर तालुक्यातील निघोज येथील जाहीर कार्यक्रमात पारनेच्या आमदार निलेश लंके यांना इशारा

निघोज (वृत्तसेवा ) :राज्यातील बड्या नेत्यांना थांबविण्याचे काम आम्ही केले असून पारनेरचा नेता आमच्यासाठी किरकोळ आहे असे म्हणत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता इशारा दिला .
पारनेर तालुक्यातील निघोज येथे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व वराळ पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार करण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील आले होते .यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस निमित्ताने तसेच खरेदी विक्री संघाच्या सर्व संचालकांचा यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ताशेठ पवार, माजी सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे तालुका प्रमुख (शिंदे गट) विकास रोहकले, डॉ शिवाजीराव खिलारी, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले, युवा नेते संदीप सालके, मनसेचे नेते सतिष म्हस्के, कॅप्टन विठ्ठलराव वराळ,संपदा पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ, कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, डॉ. राहुल विखे पाटील, यांच्यासह मोठया प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते .
खासदार विखे पाटील यावेळी म्हणाले कोणतीही निवडणूक आली की पारनेर तालुक्यातील विरोधक फक्त विखे यांनाच टार्गेट करतात . एक आमदार दोन माजी आमदारांना घेउन निवडणूक लढवतो ,ज्यांना माजी केले आहे. ते सुद्धा विद्यमान आमदारांच्या मांडीवर बसतात तिसरे माजी आमदार यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, कारण त्याच्या विषयी माझ्या मनात आजही आदर आहे. मात्र जनता हुशार आहे. जे मतदार बाजार समितीत होते त्यांनीच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट केले आहे . बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा आमरस खाल्ला अन् पॅनल त्यांचा निवडुण दिला . आता खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिर्याणी त्यांची खाल्ली अन् पॅनल आमचा निवडुण दिला असा पारनेरचा मतदार हुशार आहे . या ठिकाणी जनतेला विकास कामांचा करिष्मा चालत असून महसूल आपल्या दारी या कार्यक्रमात फक्त निघोज येथील कार्यक्रमात साडेहजार लोकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला असून सचिन पाटील वराळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम केले असून तालुक्यातील साडेतीन हजार ज्येष्ठ लोकाना आरोग्य साहित्य देउन भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी जनविकासाचे काम केले आहे .
सचिन वराळ सारखे सच्चे दिलाचे कार्यकर्ते ही आपली ताकद आहे. तालुक्यातील खिलारी , रोहकले, वराळ कुटुंब पहिल्यापासून खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर निष्ठा ठेउन काम करीत आहे. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. निवडणुकांच्या माध्यमातून नवीन कार्यकर्ते जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे.‌भावी हा कधी माजी होईल हे सांगता येत नाही. यासाठी जनतेचे कामे करीत राहा असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
सत्काराला उत्तर देताना सचिन पाटील वराळ म्हणाले, विखे पाटील कुटुंबाने आपल्याला भरभरून दिले असून बाजार समितीचे उपसभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंचपद ही सर्व पदे विखे पाटील यांनी दिलेल्या विकासकामातून जनतेने वराळ कुटुंबाला दिले आहेत. तीस कोटी रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजनेचे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने सुरु झाले असून लवकरच निघोज – पाबळ -आळकुटी गारखींडी या रस्त्याचे बारा कोटी रुपयांचे काम सुरू होणार असून याचा पाठपुरावा खासदार डॉ विखे पाटील यांनी केला असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशीर्वाद सातत्याने आम्हाला मिळत असल्याने निघोज – आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून कोणी कितीही वल्गना केली तरी निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटावर भाजपचेच प्राबल्य असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
लहू साबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निलेश घोडे व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे यांनी आभार मानले.

तिनशे विद्यार्थ्याचा स्पर्धा परीक्षेचा अडीच कोटी रुपये खर्च करणार विखे पाटील कुंटुब
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील तीनशे विद्यार्थ्यांना एम पी एस सी चा अभ्यास करण्यासाठी विखे पाटील ॲकॅडमी सुरु करण्याचा निर्णय सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त घेत असून हेच त्यांना आमच्याकडून भेट असल्याचे सांगत खासदार डॉ विखे पाटील यांनी सरकार कुणाचेही असो आपल्या तालुक्यातील विद्यार्थी तहसीलदार व अन्य पदावर अधिकारी होतील ही सर्वात मोठी सत्तेची चावी आपल्या तालुक्यातील लोकांकडे असणार आहे. हाच हा विखे पाटील ॲकॅडमीची संकल्पना असल्याने त्यांनी सांगितले.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page