पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिक

शिरूर मतदार संघात माझ्या प्रयत्नामुळे सर्वाधिक ३० हजार कोटीचे प्रकल्प मार्गी लावल्यांचे गडकरी साहेबांनीच स्पष्ट केलंय तेव्हा टिकाकारांनी जरा त्यांचे भाषण ऐका – डॉ अमोल कोल्हे

शिरूर तालुक्यात खासदारांचा गाव भेट दौरा

टाकळी हाजी ( वृत्तसेवा ): मी सातत्यांने पाठपुरावा केल्याने शिरूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले असुन, हे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच पत्रकार परिषदेमधे सांगितले आहे ,त्यामुळे विरोधकांनी टिका करण्या ऐवजी गडकरी साहेबांचे भाषण यु ट्युबला शोधा म्हणजे मी काय केले ते समजेल असे प्रतिपादन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केले .

मतदार संघातील सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळयांचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती सुरु करण्यांचा शब्द दिला होता त्यासाठी संसदेत आवाज उठवत लढा दिला, अन् बारी मोरं घोडी धरली की नाय धरली म्हणताच उपस्थितीनी टाळ्याचा कडकडाट केला .
पुणे नाशिक रेल्वे, इंदायणी मेडीसिटी प्रकल्प ,छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थळ विकास, पुणे नाशिक रस्ता, पुणे – नगर रस्ता वनऔषधी प्रकल्प या सारख्या शाश्वत प्रकल्पाचा पाठपुरावा करीत शिरूर मतदार संघाचे नाव देशाल उज्वल करण्याचे काम केल्यांचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केले . यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , माजी कृषी मंत्री शरद पवार यांची मदत मोठी झाली त्यांचे आभारही कोल्हे यांनी मानले .
कवठे येमाई ता शिरूर येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, सुहास थोरात, सोपान भाकरे, पंचायत समितीचे सदस्य डॉ सुभाष पोकळे, सरपंच सुनिता पोकळे, सरपंच बिपीन थिटे, सरपंच दत्तात्रय जोरी, सरपंच भाऊसाहेब किठे, बाळासाहेब डांगे, अशोक माशेरे,लक्ष्मण पवार,गुलाब वाळुंज,प्रमोद पऱ्हाड, शिवाजी कांदळकर, डॉ हेमंत पवार यांच्यासह मोठ्या प्रमानात कार्यकर्ते उपस्थित होते .
या वेळी खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर मतदार संघातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी वेगवेगळ्या महत्वांच्या विषयावर संसदेमधे प्रभावीपणे भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला . या भागात बिबट्यांचे प्रमान मोठ्या प्रमानात वाढलेले असल्याने मानवी वस्तीत घुसून हल्ले वाढले आहेत त्यासाठी काय स्वरूपी बिबट प्रजनन क्षमता कमी करण्यासाठी उपाय होण्याची आवश्यकता असुन, संसदेत हा प्रश्न मांडण्यात येईल .
शेतमालाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या धरसोडपणाच्या धोरणामुळे शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत असुन, गेली दोन वर्षे कांदयाची भाव कमी मिळत आहेत , त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टिका कोल्हे यांनी केली .
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, खासदार कोल्हे यांच्या संसदेमधील अभ्यासु व दमदार भाषणामुळे बारी तर फळीफोड झालीच मात्र शिरूरचे नाव देशाच्या पातळीवर उंचावले आहे . खासदार यांनी गावा गावात विविध योजनेच्या माध्यमा मधुन निधी मंजुर केला असल्यांचे त्यांनी सांगितले .
या वेळी प्रदीप वळसे पाटील म्हणाले की या सरकारने डिंबा धरणातुन बोगद्याद्वारे तळातील पाणी काढण्यांचे नियोजन सुरु केले असुन हे पाणी गेल्यास नदया कोरड्या पडतील त्यासाठी सर्वानी पक्ष भेद विसरून शेती वाचविण्यासाठी एकत्र येण्यांचे आव्हान त्यांनी केले .
या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . सर्वाचे स्वागत दत्तात्रय कांदळकर यांनी केले सुत्रसंचालन लहु साबळे यांनी केले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page