पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

कुकडीचा पाणी प्रश्न पेटणार, डिंबा धरणातील बोगद्याला प्रचंड विरोध, माजी गृहमंत्री वळसे पाटलांचा आंदोलनाचा इशारा

या निर्णयामुळे नद्यावरील बंधारे पडणार कोरडे

टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : या सरकारने डिंबा धरणामधुन बोगदा काढुन पाणी पळविण्यांचा प्रयत्न सुरु केला असुन, त्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील बागायत शेतीचे वाळवंट होईल राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणविस व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा डाव असुन तो उधळुन लावण्यासाठी सर्वानी एकत्र येत पक्षभेद बाजुला ठेऊन विरोध करा, त्यामधे अटक होण्याची वेळ आली तर मी सर्वात पुढे राहीन पण या जनतेच्या हक्काचे पाणी पळऊन देणार नाही असा इशारा राज्यांच माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यानी दिला आहे .
मलठण ता शिरूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन १० जुन रोजी अहमदनगर येथे होणार असुन त्या कार्यक्रमाच्या नियोजना साठी बैठक राज्यांचे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थिती मधे आयोजित करण्यात आली होती . या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती सुभाष उमाप, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परीषद सदस्या सविता बगाटे, स्वातीताई पाचुंदकर,घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संचालक सुहास थोरात, सोपानराव भाकरे, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकरपंचायत समिती सदस्या अरुणा घोडे,पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह मोठ्या प्रमानात विविध गावचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते .
दिलीपराव वळसे पाटीलदिलीपराव वळसे पाटील म्हणाले की डिंबा धरणामध्ये 13 टीएमसी पाणीसाठा होतो ,तसेच अतिरिक्त पाऊस होऊन 13 टीएमसी पाणी नदीला वाहून जाते हे पाणी अतिरिक्त झालेले पाणी बोगद्याद्वारे दुष्काळी भागाला देण्यास आमचा विरोध नाही . मात्र या सरकारने बोगद्याची खोली जास्त खोल करीत धरणाच्या तळाचे पाणी सुद्धा काढून घेण्याचे षडयंत्र चालविले आहे . त्यासाठी घोड व कुकडी नदीवरील 64 बांधणाऱ्यांना जे पाणी शेतीसाठी दिले जाते, ते पाणीही यापुढे बंद करण्याचा डाव सरकारचा असून हे सर्व पाणी पळविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील करीत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केला . या भागातील हक्काचे पाणी जर येथील जनतेला वंचित ठेवून कोणी पळून नेत असेल आमची बागायती जमिनीची जर कोणी वाळवंट करीत असेल तर त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आंदोलन करू असा इशारा देत आंदोलनामध्ये सर्वात पुढे मी असेल त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल मात्र डिंबा धरणातले पाणी पळून दिले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिलीपराव वळसे पाटील यांनी दिला .
माजी आमदार पोपटरावजी गावडे यांनी म्हणाले की हा कुकडीचा प्रकल्प काँग्रेसने केले, त्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या दुरदृष्टी पणामुळे दुष्काळी भागाचे नंदनवन झाले मात्र .मात्र एकही धरण न बांधता या धरणाचे पाणी पळवण्याचे काम हे भाजपचे सरकार करीत असून या सरकार विरोधात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आली आहे .
या वेळी पाण्यांच्या प्रश्नावरून जनतेने शांत बसुन चालणार नाही अन्यथा दुष्काळाशी सामना करावा लागेल असे म्हणत संघटीत होऊन लढा उभा करू असे आवाहन भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे .
या वेळी माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले . स्वागत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी तर आभार अमोल जगताप यांनी मानले .

कुकडीचे पाणी पेटणार : –
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर आंबेगाव जुन्नर पारनेर शिरूर श्रीगोंदा करमाळा तालुक्याच्या दुष्काळी भागाचे नंदनवन झाले . त्यामुळे या भागात समृद्धी आली .मात्र धरणात बोगद्याद्वारे पाणी अजून दुरच्या भागाला जाणार असल्यामुळे या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होणार नाही , पुन्हा जुने दिवस येतील त्यामुळे या भागात पाणी प्रश्न आता चांगलाच पेटणार असून त्यामध्ये येथील सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्यातील संघर्ष आता निवडणुकीच्या तोंडावर पाहावयास मिळणार आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page