नवी दिल्ली (वृत्तसेवा ) : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ में रोजी असुन, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाच्या वतीने दिल्लीत जयंती सोहळा आयोजित केला असुन ,उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केल्याने जानकर स्वतः बरोबरच बहीण पंकजा मुंडे यांचीही दिल्लीत पॉवर वाढवतात का अशी चर्चा रंगली आहे .
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांना महाराष्ट्रातले काशिराम म्हणुन ओळखतात . काशिराम त्यांचे गुरु असुन त्यांच्याच विचाराने प्रभावित होऊन जानकर यांनी कुंटुबाचा त्याग करीत विद्यार्थी दशेत राजकारणात उडी घेतली .शाहु,फुले, आंबेडकर,अहिल्यादेवी यांच्या विचारांचे राज्य आणण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्यांचे ते नेहमी सांगतात . त्यांनी प्रथम महात्मा फुले यांची जयंती त्यांच्या कुलभूमी कटगुण येथे तर अहिल्या देवी होळकर यांची जयंती चौंडीत , भिवडी ( पुरंदर) येथे राजे उमाजी नाईक, होळ येथे राजे मल्हारराव होळकर, वाफगाव येथे राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंत्या उत्सव साजरे करीत संघटन मजबुत केले .चौंडी येथील जयंती उत्सव मोठ्या प्रमानात वाढत जात धनगर समाज संघटीत करण्यांचे काम जानकरांन मुळेच झाले हे विसरता येणार नाही . त्यामुळे धनगर समाज जागृत झाला . त्यांच बरोबर आठरापगड जातीना सोबत घेऊन जानकर हे अत्यंत चालाखीने राजकीय वाटचाल करीत आहेत .आता त्यांनी आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेने वळविला असुन, माझे लक्ष मुंबई नसुन दिल्ली आहे ,असे त्यांनी सांगत मी एक दिवस कोणत्याही पक्षाच्या मदतीने पंतप्रधान होणारचं असा विश्वास ते व्यक्त करतात . त्यामुळे दिल्लीचे लक्ष गाठण्यासाठी महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, माऊली सलगर व इतर पदाधिकारी यांच्यावर सोपवत उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आसाम, तामिळनाडू, मध्यप्रदेश राज्यात पक्षाची संघटना वाढविण्याकडे लक्ष देत आहेत . त्या दृष्टीने त्यांनी दिल्लीत अहिल्या देवी जयंती सोहळा साजरा करीत धनगर समाजाची महाराष्ट्रा प्रमानेच उत्तरे कडेही सर्वाना सोबत घेऊन मोट बांधण्यासाठी जानकरांची हा प्रयत्न दिसत आहे . त्यांनी ओबीसी प्रश्ना संदर्भात दिल्लीत मोर्चा काढला होता त्यामुळे देशातील ओबीसी नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्ग असुन हीच त्याची राजकीय ताकद आहे . माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नंतर दिल्लीतही वजन असलेला महाराष्ट्रातील जानकर हे एक बहुजन नेतृत्व असुन, त्यांचा दांडगा जनसंपर्ग, इंग्रजी हिंदी भाषेवरच प्रभृत्व या जमेच्या बाजु ठरत आहे .
नवी दिल्ली येथे सत्य साई सभागृह लोधी रोड येथे ३१ मे रोजी सांयकाळी ६:३० होणार आहे . या कार्यक्रमासाठी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी उद्घाटक असुन माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम होणार आहे . या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, सॉलिस्टार एच विश्वनाथ, शेफर्ड इंडीया इंटरनेशनल राष्ट्रीय अध्यक्ष , माजी खासदार सागर रायका, प्रबल प्रताप सिंह,रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एलअक्कीसागर , राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर पुर्व भारत प्रभारी रामकुमार पाल, यांच्यासह मोठ्या प्रमानात विविध पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे . या कार्यक्रमात नितीन गडकरी, महादेव जानकर, पंकजा मुंडे एकाच व्यासपिठावर एकत्र येणार असल्याने या सभेत जानकर, गडकरी काय बोलतात या कडे लक्ष लागले आहे .