कृषीपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण

एक दिवस या देशाचा पंतप्रधान होऊन शिरूरला येणार : महादेव जानकर

शिरूर येथे जानकरांचा सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

शिरूर (वृत्तसेवा ) : शेतकऱ्याच्या मुलांना शेतीचं न करता आयएस,आयपीए, एमपीएसी करून अधिकारी व्हावं,उद्योग व्यवसाय ,राजकारण केले पाहिजे तरचं प्रगती साध्य करता येईल, मी या देशात गोरगरीबाच्या पोरांना आमदार खासदार करीत मी एक दिवस या देशाचा पंतप्रधान होऊन शिरूरला हेलिकॉप्टरने येईल असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला .
शिरूर जि पुणे येथे शेतकरी मेळावा, अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते होते. यावेळी प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, रासपाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष विनायक रुपनवर , महीला जिल्हाध्यक्ष सुनिता किरवे,अंकुश देवाडकर, माजी पंचायत समिती सदस्य राम कदम, माजी सरपंच लक्ष्मणराव वाळके, माजी चेअरमन अशोक माशेरे, लक्ष्मण पवार, रामदास थोरात, राजेंद्र कटके, पारनेरचे युवा नेते रुपेश ढवण, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आसवले, माजी सरपंच जगदिश पाचर्णे,यांच्यासह रासपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे ,शिरूर शहर अध्यक्ष सिकंदर पटेल, महिला अध्यक्ष चेतनाताई पिंगळे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमित खांडेकर, युवा अध्यक्ष संदीप देवकाते, महीला उपाध्यक्ष सपना मलगुंडे,उपाध्यक्ष वाल्मिकराव करहे, राजेंद्र पुणेकर, संपर्ग प्रमुख राजेंद्र थोरात,सरचिटनिस विकास पवार , माजी युवा अध्यक्ष अमोल देवकाते, युवा महीला उपाध्यक ॲन्ड अपेक्षा कुरहाडे , देविदास पवार, विलास रोहीले, सुभाष घोडे, लक्ष्मण भाईक उपस्थित होते .
या वेळी महादेव जानकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलाने शेती न करता एकाने व्यवसाय दुसऱ्याने अधिकारी, आमदार खासदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे प्रशासनाच भाग बनुन काम करणे गरजेचे आहे . त्यासाठी गोरगरीब मुलांना दिल्लीत स्पर्धा परीक्षा केंद्र लोकवर्गणी मधुन निर्माण करण्यात येत असल्याने राज्यातील मुलाचा युपीएससी परीक्षेत मधे टक्का वाढला पाहीजे त्यासाठी प्रयत्न करीत असल्यांचे जानकर यांनी सांगितले . या वेळी रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, अशोक माशेरे, राम कदम यांनी मनोगत व्यक्त केले . प्रस्ताविक अध्यक्ष शिवाजी कु्रहाडे यांनी तर सुत्रसंचालन प्राचार्य गोरक्षनाथ दुबे यांनी आभार शहराध्यक्ष सिंकदर पटेल यांनी मानले .

दिल्लीतील युपीएससी केंद्रासाठी पत्रकारांचा पुढाकार –
राज्यातील गोर गरीब मुलांसाठी युपीएसी परीक्षासाठी दिल्लीत स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची संकल्पना राज्यांचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली त्या साठी राज्यभरातुन लोकवर्गणी गोळा होत आहे त्यासाठी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी प्रयत्न करीत पत्रकारांच्या वतीने ५१ हजार रुपयाची वर्गणी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर व पारनेरचे जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते जानकर यांना देण्यात आले . या वेळी जेष्ठ पत्रकार अभिजीत आंबेकर, सतिष धुमाळ, पोपट पांचगे, नवनाथ रणपिसे, सतिष केदारी उपस्थित होते . जानकर यांनी पत्रकार संघ करीत असलेल्या कार्याची दखल घेत पत्रकारांनी मला लढण्याचे बळ दिले, पक्षाला मदत करणारा हा देशातील पहीला पत्रकार संघ आहे , पत्रकार संघाच्या भवनासाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे म्हणत आभार मानले .

शिरूर – पारनेर मधे जानकरांचा आर्शिवाद कोणाला मिळणार

जानकर यांच्या कार्यक्रमासाठी शिरूर व पारनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी गर्दी केल्यांने जानकर आपली राजकीय पॉवर आगामी निवडणुकीच्या तोंडावर वाढवित चालले असुन, या निवडणुकीत जानकरांचा आर्शिवाद या दोन्ही मतदार संघात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार तोच आमदार होणार हे मात्र नक्की .

दुधाची पाच रुपयांने भाववाढ करणारा देशात पहीला मंत्री ठरले जानकर .
सर्व अधिकारी वर्गाचा विरोध असताना, शेतकऱ्यांच्या दुधाला एकाच वेळी पाच रुपयाची दरवाढ देशात प्रथम देऊन शेतकरी दुधउत्पादक यांच्यावर होणार अन्याय मी पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री असताना दुर केला, शरद पवार यांनी पाच पैसे तर अनंतराव थोपटे यांनी तीन पैश्याची भाववाढ केली होती . या बदद्ल पंतप्रधान मोदीनीनी माझे कौतुक केले देशात, मात्र भाववाढ करताना . मला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी साथ दिली असे जानकर यांनी सांगितले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page