गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथे घराचा दरवाजा तोडुन पावणेसहा लाखाचा ऐवज लांबविला

चोरीच्या घटनेमुळे बेट भागात जनतेमधे भितीचे वातावरण

नवनाथ रणपिसे
पिंपरखेड (वृत्तसेवा ) :पिंपरखेड ता. शिरूर येथे चार -पाच जनाकडून बाळू नावजी दाभाडे यांच्या घरावर जबरी चोरी करून सुमारे पाच लाख सत्त्यांशी हजार रुपयाचा ऐवज लुटला असल्याने नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

या बाबत  सहाय्य्क पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले की,पिंपरखेड ता. शिरूर येथे दाभाडे मळा येथील बाळू नावजी दाभाडे यांच्या घरावर बुधवार दि. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास चोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत सुमारे दहा -बारा तोळे सोने व रोख पाच हजार रुपये असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली याबाबत प्रदीप बाळू दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असुन 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.रात्रीच्या वेळी चोरांनी अंधाराचा फायदा घेत शेजारील घरांच्या कड्या लावून घरात प्रवेश केला व कपाटातील कपडे असताव्यस्त करत हत्यारांचा धाक दाखूवून महिलांच्या गळ्यात असणारे संपूर्ण दागिने ओरबाडून घेत शेजारील घराकडे मोर्चा वळवत अंजनाबाई दाभाडे यांच्या कानात असणारे वेल व रोख पाच हजार रुपये काढून घेत असताना ( ओढून) घेतल्याने त्यांचा कानाला जखम झाली.त्यानंतर चोरांनी पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलिस कर्मचारी विशाल पालवे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी श्वान पथकासह भेट देत चोरांचे बोटाचे ठसे घेतले असुन ते तपासणी साठी पाठवले असुन तपासणी केल्यानंतरच त्याचा तपास करण्यात येईल असे पन्हाळकर यांनी सांगितले तसेच यापूर्वी देखील जाधव कुटुंबीयांची पिंपरखेड येथे अशाच पद्धतीने चोरी केल्याची घटना घडली असुन तोही तपास पोलिस यंत्रणेकडून लागला नसून लवकरात लवकर ह्या घटनेचा तपास करून चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांसह सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे.

बेट भागात सध्या चोरांचा सुसाट वाढला असून शेतकऱ्यांच्या मोटार पंप , केबल तसेच शेतीची अवजारे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे . मात्र पोलीस खात्याचे याकडे दुर्लक्ष असून चोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस खाते दारू धंदे याच्यावर लक्ष ठेवीत लक्ष्मी कृपा करून घेण्याच्या नादात रमले असल्याचे चित्र दिसत आहेत . दिवसा ढवळ्या दारुच्या भट्टया सुरु असुन सुद्धा कारवाई केली जात नाही . तसेच एखादयांने अवैध दारूधंद्याची तक्रार केल्यास त्या व्यक्तीचे नाव अवैध धंदेवाल्यांना झिरो पोलिस होमगार्ड यांच्याकडुन समजत असल्यांची चर्चा नागरीकांमधे आहे त्यामुळे अवैध धंदेवाले यांच्या विरोधात तक्रार करण्यास सामान्य माणुस धजावत नाही त्यामुळे गावागावात मोठ्या प्रमानात अवैध व्यवसाय वाढले असुन, त्यामुळेच व्यसनाधिन झालेले तरुण चोरीकडे वळत आहेत .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page