Uncategorizedगुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबई

कुंटूब नियोजन शस्रक्रीया करताना झाला महिलेचा मृत्यु

कवठे येमाई ता शिरूर येथील रेखा अर्जुन हिलाल या मातेचा मृत्यु

शिरूर (वृत्तसेवा ) : टाकळी हाजी ता शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधे कुंटुब नियोजन शस्त्रक्रीया करताना एका महिलेचा दुर्देवी मृत्यु झाल्यांची घटना घडली आहे .
टाकळी हाजी ता शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रिया सुरु असताना रेखा अर्जुन हिलाल (वय २८ ) असे दुर्देवी मृत झालेल्या महिलेचे नाव असुन, या निधनाने महीला वर्गात तिव्र नाराजी व्यक्त केली जात असुन, या महिलेच्या मृत्युची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे व पंचायत समितीचे सदस्य डॉ सुभाष पोकळे यांनी केली आहे . या बाबत टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ प्रियांका घुगे यांनी सांगितले की, येथे टाकळी हाजी केंद्रातील ४२ तर कवठे केंद्रातील ३८ अश्या ८० महीला कुंटुब नियोजन शस्त्रक्रीयेसाठी आल्या होत्या . डॉ शिवाजी गजरे यांनी शस्त्रक्रीया केल्या . रेखा हिलाल ही कवठे येमाई प्रार्थमिक आरोग्य केंद्रामधील असुन, त्यांची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑप्रेशन टेबलवर घेतले . त्यांची तब्बेत एकदम ठणठणीत होती मात्र शसक्रीया सुरु झाल्यानंतर त्या घाबरल्या त्यांना त्रास जानऊ लागल्याने त्याना खाली घेतले व पुढील उपचारासाठी शिरूरला पाठविले मात्र त्या पुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता . रेखा हिलाल यांना दोन मुले आहेत . त्यांच्या मृत्युमुळे आरोग्य खात्यांच्या सेवेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे . विशेष म्हणने रेखा हिलाल या कवठे येमाई आरोग्य केंद्रामधील असुन तेथील ३८ महीला शस्त्रक्रीयेसाठी रुग्नवाहीकेने टाकळी हाजी येथे आणण्यात आल्या होत्या मात्र कवठे येमाई येथील दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही . सध्या तालुक्यात आरोग्य सेवा रामभरोसे असुन असे किती लोंकाचे प्राण घेणार आहात असा संप्तप्त सवाल जनते मधुन केला जात आहे . अनेक वेळा रात्री महीला रुग्न आल्यास सरकार दवाखाण्यात डॉक्टर राहत नसल्याने त्यांना खाजगी दवाखाण्यात जाते लागते . या बाबत तालुका वैदयकीय अधिकारी दामोधर मोरे म्हटले की सखोल चौकशी केली जाईल . शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल असे मोरे यांनी सांगितले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page