कृषीपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

बापुसाहेब गावडे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिताताई सोनभाऊ गावडे, तर उपाध्यक्षपदी खंडु जाधव यांची बिनविरोध निवड

पतसंस्थेच्या नावाचा नावलौकिक वाढविण्यांचा संचालक मंडळाचा निर्धार

टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब यांनी तालुक्यात गेली ५५ वर्षे राजकारण व समाजकारण करीत असताना जलसिंचन, कृषी उदयोग ,शिक्षण क्षेत्रात चौफेर विकास केला , त्यांच्याच नावाने असलेल्या बापूसाहेब गावडे पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या नावाला साजेशी असे काम केले जाईल असे प्रतिपादन बापूसाहेब गावडे पतसंस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुनिता सोनभाऊ गावडे यांनी व्यक्त केला .
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील बापूसाहेब गावडे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई सोनभाऊ गावडे तर उपाध्यक्षपदी खंडू सोनबा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली . या वेळी त्यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला त्या वेळेस त्या बोलत होत्या .शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे , युवा नेते राजेंद्रदादा गावडे,बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात , शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते,चांदाशेठ गावडे ,चंद्रकांत भाऊ साबळे, उद्योजक बापुसाहेब साबळे, चेअरमन प्रशांत चौरे, प्रभाकर खोमणे,
माजी विद्याथ्यी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, विकास सेवा संस्थेचे संचालक संतोष गावडे, सुभाष नाना गावडे,देविदास पवार, सुभाष चोरे, बबनराव चोरे, रामदास भाकरे, नारायण कांदळकर, सोपानराव औटी, प्राचार्य आर बी गावडे , शहाजी सोदक, अरुण हिलाल, स्वप्निल गावडे, बापुसाहेब होने, हनिफ आतार विकास खाडे, संतोष घोडे, यांच्यासह मोठ्या प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते . या निवडीनंतर गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली . हि निवडणुक बिनविरोध होण्यासाठी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे व माजी सरपंच दामुशठ घोडे यांनी प्रयत्न केले . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एस एम रुणवाल यांनी काम पाहीले .
या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे – सुनिता सोनभाऊ गावडे ,राजेंद्र पोपटराव गावडे, सुरेश नाना गावडे, खंडु सोनबा जाधव,कैलास लक्ष्मण गावडे, बाबाजी मारुती रासकर,मोहन म्हतु गावडे,अनिता रोहीदास घोडे, शंकर मुरलीधर होने,विनोद खंडु बोखारे, बाळासाहेब शंकर टेमकर हे निवडुन आले असल्यांचे निवडणुक निर्णय अधिकारी रुणवाल व पतसंस्थेचे व्यवस्थापक शरीफ तांबोळी यांनी सांगितले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page