पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शासनाचे दोन वाळु विक्री केंद्र होणार सुरु

वाळु तस्करांची धाबे दणाणली . तस्करीला बसणार चाप

शिरूर:( वृत्तसेवा ): शिरूर (जि पुणे ) तालुक्यातील घोड धरण जलाशयात गाळमिश्रित वाळू काढण्यासाठी राज्यात पहिले दोन वाळू डेपो केंद्रास परवानगी दिली असुन त्यामधून पुणे,नगर जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्तात वाळू पुरविली जाणार असल्याने सर्वसामान्य माणसांचे घरांचे स्वप्न पुर्ण होणार आहे .मात्र यामुळे या परीसरातील सराईत माती व वाळु तस्करीला लगाम बसणार असल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे .
गेली अनेक वर्षे वाळु ठेक्यांचा लिलाव झाला नाही . त्यामुळे वाळुचे बाजार भाव गगनाला भिडल्यामुळे सध्या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.हे भाव आठ ते दहा हजार रुपये प्रती ब्रासपर्यंत पोहचले असुन त्यातही अनेक तस्कर मुरुम माती क्रश सॅन्ड एकत्र करून वाळु म्हणुन विक्री करीत आहेत ,त्यामुळे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे .शासनानाने महाराष्ट दिनाच्या दिवसी नवीन वाळु धोरण २०२३ महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले .यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची भावना लक्षात घेऊन नवीन वाळू धोरण असल्याने सर्वसामान्य माणसाला प्रति सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू उपलब्ध होणार आहे .त्यामधे घरकुल योजनेच्या लाभार्थीना प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार राज्य सरकारने नवीन वाळू धोरण ठरविले आहे. त्यानुसार वाळू लिलाव प्रक्रियेला प्रतिबंध घालून नागरिकांना ऑनलाइन त्या वाळू पुरविण्याचे धोरण राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तपासणी करताना शिरूर तालुक्यातून घोडनदी येथे पिंपळाचीवाडी (निमोने ) व चिंचणी या ठिकणी मोठ्या प्रमाणात गाळ व वाळू असल्याचे स्पष्ट केले .त्यामुळे या ठिकाणी पूर येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नदीतून गाळ आणि वाळू यांत्रिक पद्धतीने काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मान्यता दिली त्यामुळे . धरणात पाणी साठ्यात वाढ होणार आहे .त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळूचे पहिले दोन केंद्र शिरूर तालुक्यात निश्चित केले आहे .

शिरूर तालुक्यात चिंचणी व निमोणे या ठिकाणी दोन वाळू केंद्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी गायरान जमिनीची जागा देण्यात येणार आहे ,नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार ऑनलाइन नोंदणी केल्या करून प्रती ब्रास ६०० रुपये दराने पुणे व नगर जिल्ह्यातील नागरिकांना वाळू उपलब्ध होईल असे जिल्हा खनिजकर्म अधिकारी संजय बामणे यांनी सांगितले आहे .
गेली अनेक वर्षे लिलाव प्रक्रीया न राबविल्याने (पिंपळाचीवाडी ) निमोणे परीसरात वाळु तसेच विट भट्यासाठी मातीची तस्करी मोठ्या प्रमानात सुरु होती . ती आताही कायम असुन, पिंपळाचीवाडी येथे वाळुचा शासकीय डेपो सुरु होणार असुन वाळु उपसा व विक्री वाहतुक यावर सीसीटी कॅमेऱ्यांची नजर असल्यामुळे तस्करी थांबणार असल्यांने तस्कराची धाबे दणाणले असुन, ही वाळु केंद्र सुरु होऊ नये म्हणुन तस्कर सक्रीय झाले आहेत .
लवकरचं राज्यांचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घघाटन करण्यात येणार असुन, त्या दृष्टीने तयारी सुरु असल्यांचे जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांनी सांगितले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page