शिरुर ( वृत्तसेवा ) : पुणे व मुंबई येथील थिएटर मधुन प्राईम टाईमच्या वेळेत टीडीएम या चित्रपटास वेळ मिळावी व थिएटर मध्ये हा चित्रपट लावावा अशी मागणी करित टीडीएम या चित्रपटाचे निर्माता दिगदर्शक भाउराव क-हाडे यांच्या समर्थनार्थ शिरुर शहरात त्याच्या मित्र परिवार व नागरीक थेट रस्त्यावर उतरले व ट्रक्टर रॅली शहरातून काढली .
एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याचे दुर्मिळ चित्र यावेळी दिसुन आले .
.शिरुर परिसरातील गव्हाणेवाडी येथील निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर बबन हा चित्रपट ही लोकप्रिय झाला होता. त्याच्या बहुचर्चित टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्यासह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित झाला होता. परंतु चारच दिवसांत अनेक प्रतीथयश चित्रपटगृहांमधून अचानकपणे हा चित्रपट काढून टाकण्यात आला.तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे खचलेल्या भाऊराव कऱ्हाडे व चित्रपटातील कलाकारांनी टोकाचा निर्णय जाहीर केला.या पार्श्वभूमीवर शिरूर मधील भाऊराव कऱ्हाडे यांची मित्रमंडळी समर्थक एकवटले असून त्यांनी कऱ्हाडे यांच्या पाठीशी उभे राहताना चित्रपटाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रक्टर मोर्चा काढला .
पुणे नगर या रस्त्याने हा ट्रक्टर मोर्चा निघाला आय सपोर्ट टीडीएम , प्राईम टाईम वेळेत टीडीएम चित्रपटाला वेळ मिळालाच पाहीजे , मी भाउराव यांच्या सोबत असे फलक मोर्चात झळकत होते . पुणे नगर रस्त्याने मोर्चा तहसिल कार्यालयावर गेला .
यावेळी आमदार ॲड अशोक पवार , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , दिपक नागवडे , बाबूराव पाचंगे ,नितीन पाचर्णे , उमेश शेळके , रवींद्र धनक , रामकृष्ण बीडकर ,शिवाजी कु – हाडे , राधाकृष्ण बाचकर ,अनघा पाठकजी , रेश्मा शेख , रावसाहेब चक्रे ,शशिकला काळे , राणी कर्डीले,वर्षा काळे , श्यामकांत वर्पे , अनिल पवार , अविनाश घोगरे , विशाल जोगदंड ,डॉ .स्वप्ननील भालेकर , किरण बनकर , रवींद्र खांडरे , नाथा पाचर्णे, युनुस सय्यद आदीसह चित्रपट कलावंत उपस्थित होते .
प्रास्ताविक प्रा सतीश धुमाळ यांनी तर सुत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले आभार बाबूराव पाचंगे यांनी मानले . खचु नका आम्ही आहोत सोबत – शिरूरकरांची भावनिक साद ..
भाउराव तुम्ही खचु नका व निराश होवू नका आम्ही सर्वजन तुमच्या पाठीशी आहोत . शिरुर गव्हाणेवाडी परिसरातील ग्रामीण भागातील तरुण भाउरावच्या रुपाने चित्रपटसृष्टीत नवे काही करु पाहत आहे आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी भरभक्कम पणे उभे असल्याचे भावना शिरुरकरांनी व्यक्त केली शेतकरी रिक्षाचालक वीटभट्टी मजुर ते चित्रपटसाठी शेत जमीन विकणारा ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अशी रुपे भाउरावाची आम्ही पाहीले असुन चित्रपटसृष्टीत तो नव इतिहास घडविणार असुन भाउरावास जपणे व त्याला प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी असल्याचे काहीनी सांगितले