गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वाघोलीत लागली मंडप डेकोरेटर्सच्या गोडाऊनला आग..! तीन कामगारांचा मृत्यु

पिंपरी येथील बॅक ऑफ बडोदा शाखेला लागली आग

वाघोली (वृत्तसेवा ) : पुणे नगर रस्त्यावरील वाघोली ता हवेली येथे उबाळे नगर येथील ” शुभ सजावट” या मंडपाच्या गोडाऊनला आग लागल्याची दुर्देवी घटना घडली या आगीत तीन कामगारांचे मृतदेह आढळल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांकडून देण्यात आली आहे.

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास वाघोली जवळ असणाऱ्या उबाळे नगर परिसरात असणाऱ्या मंडप साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली होती. या आगी बाबत अग्निशामक दलाच्या जवानांना कळवण्यात आले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळख अग्निशामक दलाच्या जवानांनी आग लागलेल्या ठिकाणी पाच वाहने घटनास्थळी दखल झाली. आगीमध्ये चार सिलेंडर फुटल्याची माहिती जवानांना मिळाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत जवानांना तीन कामगारांचे मृतदेह मिळाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आग लागलेल्या गोडाऊन शेजारीच चारशे सिलेंडर भरेलेले गोडाऊन आहे. मात्र त्याला कुठलाही धक्का न लागता जवानानी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे,त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मृतदेह पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हे कामगार या मंडपात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, आगीचे लोट चे लोट बाहेरपर्यंत पसरले होते.

पिंपरीतील बँक ऑफ बडोदा शाखेला आग

खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली होती. पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. महत्वाची कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून मात्र नुकसान मोठे झाले आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page