पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसामाजिक
महाराजा यशवंतराव होळकर यांची शौर्य यात्रा दिनांक ७ में रोजी पुण्यातुन प्रस्थान ,८ में रोजी शिरूर मधे होणार जंगी स्वागत
शिरूर येथे सर्वानी उपस्थित राहण्याचे युवा नेते राजेंद्रदादा गावडे यांचे आवाहन

महाराष्ट्रात शिरूर, अहमदनगर, शिर्डी, धुळे मार्गे जाणार यात्रा
ठिकठिकानी स्वागताची जय्यत तयारी
शिरूर (वृत्तसेवा ) : शुर योद्धा महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांची शौर्ययात्रा पुणे ते इंदोर अशी निघणार असून या यात्रेची सुरुवात रविवार दि ७ मे रोजी पुणे (सारसबाग ) येथून होणार असून मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शौर्य यात्रा व महाराजा यशवंतराव होळकर स्मारक समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .
शुर योद्धा महाराजा यशवंतराव होळकर यांचा भव्य पुतुळा इंदौर येथे दि १३ मे रोजी बसविण्यात येणार आहे . हा पुतुळा पुण्यात तयार करण्यात आला असुन घोड्यावर स्वार झालेला हा भव्य १३ फुट उंचीचा आहे . दि ७ रोजी पुण्यात भव्य मिरवणुक काढण्यात येणार असुन त्यासाठी राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच सोमवार दि ८ रोजी शिरूर येथे सकाळी ११ वाजता यात्रा येणार असुन तेथे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे तालुक्यातील नागरीकानी मोठ्या संख्येने स्वागत मिरवणुकी मधे सहभागी व्हावा असे आवाहन युवा नेते राजेंद्रदादा गावडे यांनी केले आहे . शिरूर हुन अहिल्यानगर येथे मुक्कामी जाणार आहे . मंगळवार
दिनांक ९ में रोजी राहुरी शिर्डी मार्गे कोपरगाव येथे मिरवणुक व कार्यक्रम होऊन मुक्काम होईल .
बुधवार दि १० मे रोजी कोपरगाव वरून मनमाड मालेगाव धुळे येथे पोहणार असुन मुक्काम सोनगिर येथे होईल .
गुरुवार दिनांक ११ में रोजी सोनगिर वरून शिरपुर जुलवानिया वरून अजंड येथे मुक्काम होईल . शुक्रवार दि १२ सकाळी अजंड वरून ठिकरी मानपुर सांयकाळी इंदौर येथे आगमन होईल .