कृषीपुणेपुणे जिल्हामुंबईराजकारण

सत्ता राष्ट्रवादीची मात्र चर्चा फक्त देवदत्त निकम यांच्याच विजयाची .

माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पॅनल विरोधात देवदत्त निकम यांनी केली होती बंडखोरी

संजय बारहाते
शिरूर : नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत पुणे, वगळता जिल्ह्यातील इंदापुर, बारामती, जुन्नर, आंबेगाव खेड, पुरंदर भोर मधे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, महाविकास आघाडीने बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले आहे मात्र उत्तर पुणे जिल्हयात गावच्या कट्यावर चर्चा रंगली आहे एकाच पठ्यांच्या विजयाची .. ती म्हणजे देवदत्त निकम याची .
सहकार क्षेत्रात पुणे जिल्हयात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा जिल्हयात कायमच वर्चस्व राहीले आहे .त्यांच प्रमाने आंबेगाव तालुक्यात माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, शरद सहकारी बॅक या संस्था तालुक्यात उभ्या केल्या, आणि गुणात्मक दृष्ट्या विकास करीत प्रगती पथावरही नेल्या आहेत . संस्थाच्या मधे त्यांनी पारदर्शी कारभार करीत शेतकरी सभासद यांच्या हिताच्या दृष्टीने सचोटीने कारभार केला . त्या संस्थाचा अध्यक्ष कुणीही असो मात्र सदैव त्यांच्या बारीक सारीक निर्णयावर वळसे पाटील यांनी लक्ष ठेवत संस्था भरभराटीला आणल्याही, त्यांचा अभिमान आंबेगावकरांना निश्चित आहे .
त्यामुळेच भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यास देश व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळवित राज्यात आदर्श कारखाना म्हणुन उल्लेख होतो .या मधे अध्यक्ष राहीलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात व वळसे पाटील यांच्यात टोकाचा विरोध झाल्यानंतरही आढळरावानी भिमाशंकर बाबत सहमतीचे राजकारण करीत निवडणुका बिनविरोध केल्या आहेत .
मात्र नुकत्याच झालेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालामुळे १८ जागा पैकी १७ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने मोठ्या मताधिक्यांने दणदणीत विजयी होत जिंकल्या मात्र चर्चा होतीय ती एका जागेवर मिळालेल्या विजयाचीच …
आता पर्यन्तच्या आंबेगावच्या राजकारणात माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना सोडुन जाणार्यांना तालुक्याच्या राजकारण कायम पराभवच स्विकारावा लागला . त्यात फक्त माजी खासदार आढळराव पाटील लोकसभेला विजयी झाले . मात्र बाजार समिती निवडणुकीत देवदत्त निकम यांनी विजयी मिळवत या पंरपरेला खोडा घातला आहे .
देवदत्त निकम हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, कुकडी पाणी वाटप संस्थेचे सदस्य या महत्वांच्या पदावर त्यांनी काम केले . वळसे पाटील यांचा विश्वासु कार्यकर्ता म्हणुन त्यांना शिवाजीराव आढळराव यांच्या सारख्या तगड्या उमेदवारांच्या विरोधात शिरूर लोकसभा मतदार संघामधुन २०१४ मधे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीही दिली .त्यात त्यांना अपयश आले मात्र झुंज देण्याची हिम्मंतही मिळाली. दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यांना भिमाशंकर कारखाना,मंचर बाजार समितीमधे दिलेल्या कामाच्या संधीचे सोने करीत नेत्तृत्व गुणांची छाप सर्वसामान्य माणसावर नक्कीच पडली आहे . बाजार समिती मधे राष्ट्रवादीने न दिल्यामुळे उमेदवारी त्यांनी बंडखोरी करीत निवडणुक लढविण्यांचा निर्धार केला . राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करणही ऐवढं सोप नव्हते . सर्व संस्था पक्षाच्या ताब्यात तसेच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा हि तर आंबेगाव राष्ट्रवादीची खासियत आहे , मात्र मी साहेबांना देव मानतो, साहेबांवाच होतो आणि राहीन,माझं चुकलंय काय अशी भावनिक साद घालित मतदारांना निकम यांनी आव्हान केल्याने मतदरांनी बाकी १७ राष्ट्रवादी एक निकम म्हणत मतदान करीत देवदत्त निकम यांच्या विजयांचा मार्ग सुकर केला आहे.
सध्या गावोगाव चर्चा झडत आहे ती फक्त निकम यांच्याच विजयाचीच .राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच बरोबरचं राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक ही सोशल मिडीयावर देवदत्त निकम यांचे अभिनंदन करीत असुन,शिरूर आंबेगावच्या राजकारणात या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page