टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात शेतात काम करणाऱ्या व्यक्तींवर कोल्ह्याने हल्ला केल्यामुळे तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे .
टाकळी हाजी येथील तामकरवाडी येथे दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असलेले दशरथ मारुती मुंजाळ यांच्या हाताला चावा घेतल्याने त्यांना दहा टाके पडले आहेत ,तर दुसऱ्या ठिकाणी शेतात काम करीत असलेल्या पूजा विनोद कळकुंबे यांच्या डोळ्याला जखमा झालेले आहेत तर सुरेश मारुती चोरे यांच्यावर यांच्या पायाला चावा घेतल्याची माहीती टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक संतोष गावडे यांनी दिली .गेल्या आठवड्यापूर्वीही शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर कोल्ह्याने हल्ला केल्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती .हा एकच कोल्हा वारंवार माणसावर हल्ला करीत असून त्यामुळे शेतात काम करणारे माणसे भयभित झाले आहेत . वन विभागाने त्वरित पिंजरा लावून कोल्ह्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतोष गावडे यांनी केले आहे .