शिरूर (वृत्तसेवा ) : शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या रावडेवाडी ता शिरूर येथील दोन अट्टल चोरांना पुणे जिल्ह्यासह पारनेर , श्रीगोंदा ( अहमदनगर ) तालुक्या मधुन तडीपार करण्यांचे आदेश पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिले आहेत .
शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळी हाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह विद्युत शेती मोटारीची मोठया प्रमाणावर चोरी झाल्या .त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ०९ गुन्हे दाखल झाले होते . इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरीता शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस ठाणे तपास पथक व टाकळी हाजी पोलीस चौकीचे अधिकारी अमंलदार यांना सांगुन त्याप्रमाणे तपास पथकाने चोरांचा कसून शोध घेवून सदर इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे आरोपी १) पांडुरंग शिवाजी बोडरे वय २१ वर्षे २) मोन्या उर्फ कुलदिप बबन बोडरे वय २२ वर्षे दोघे रा. रावडेवाडी ता. शिरूर जि.पुणे यांना पकडुन त्यांचेकडुन सुमारे १६ इलेक्ट्रीक पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आले होते. त्यांनी या मोटारी भंगार वाल्याला विकल्या होत्या . त्याने नाशिक ला मोटारी पसार केल्या . मोटार चोरीमुळे शेतकरी हतबल झाले होते . या आरोपीना ९ गुन्हयात अटक करून कोर्टात हजर केले होते.
त्याची अंकीत गोयल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी गंभीर दखल घेवुन सदर आरोपीतांना १ वर्षाकरीता पुणे जिल्हा ( पिंपरीचिंचवड शहर व पुणे शहर हददीसह) अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन दि. २७/४ / २०२३ पासुन तडीपार करण्यात आले आहे. व यापुढील कालावधीतही शेतक-यांचे इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगीतले आहे.
वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार करणेकामी यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग व सुरेशकुमार राउत पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उप निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहा पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक,सुनिल उगले, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार परशराम सांगळे यांनी कामकाज पाहीले आहे.