पारनेर (वृत्तसेवा ) : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या पॅनलने खासदार सुजय विखे पाटील यांच्या पॅनलला धूळ चारीत सर्व जागा जिंकल्या असून महाविकास आघाडीचा डंका या बाजार समितीवर वाजला आहे .
खासदार सुजय विखे पाटील यांच्या एंट्रीने पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठी रंग निर्माण झाली होती . सुरुवातीला या बाजार समितीमध्ये तीन पॅनल होतील असे चित्र होते .मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळत विद्यमान आमदार निलेश लंके व माजी आमदार विजयराव यांनी एकत्र येत पॅनल उभा केला .त्या पॅनल समोर खासदार सुजय विखे यांनी एकट्याने मोठे आव्हान निर्माण केले होते .मात्र आजी-माजी आमदारांच्या जोडीने सर्व मतभेद विसरून नियोजनबद्ध केलेला प्रचार , करीत दुंभगलेल्या कार्यकर्त जुची मने जुळवीत सचोटीने प्रयत्न केल्याने या निवडणुकीत सर्व जागा जिंकत लंके औटी जोडीने विखे पाटलांना धुळ चारली आहे .