गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्र

तु पाच लाख दे नाहीतर खेळ खल्लास, ग्रामसेवकांचे सिनेस्टाईल अपहरण

पुण्याजवळ कुडजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवका कडुन खंडणी वसुल

पुणे ( वृत्तसेवा ) : तु पाच लाख रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास करतो अशी धमकी देत गाव कुडजे ता. हवेली, जिल्हा-पुणे येथील ग्रामसेवक महेशकुमार नानासाहेब खाडे वय ३९ यांना रस्त्या मधुन अपहारण करीत डांबून ठेवत खंडणी उकळल्या प्रकरणी सहा जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या सिनेस्टाईल अपहरणा मुळे नोकरदार वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे .

याबाबत पुण्यात उत्तम नगर पोलिस स्टेशनला सराईत गुन्हेगार विकास प्रकाश गायकवाड व इतर पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत ग्रामसेवक खाडे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार माहीती अशी की ते फोर व्हिलर गाडी क्रमांक MH12/vc/7576 गाडीतुन मधुन जात असताना नटराज हॉटेल जवळ आलो असताना त्यांच्या गाडीचे समोरील बाजुस एक दुचाकी गाडी आली. त्यावर दोन अनोळखी इसम बसलेले होते. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने एक मोकळी बीयरची बाटली माझे गाड़ी समोर फोडली, त्यामुळे मी माझी गाडी थाबविली. तेव्हा ते दोन्ही इसम माझे गाडीपाशी आले. त्यांनी मला विचारले की, ” हॉर्न का वाजविला? आम्ही मुळशीचे आहोत.” असे सांगुन वाद घालत असताना कुंडजे गावामध्ये राहणारा माझे तोंड ओळखीचा विकास गायकवाड हा ऑक्टीव्हा गाडीवर तेथे आला. तो त्या दोन अनोळखी इसमांना म्हणाला की, “अरे भाऊसाहेब आपल्या येथील आहेत, त्यांना तुम्ही काही बोलु नका, आपण सरपंच समिर पायगुडे यांचे हॉटेलवर जाऊन विषय मिटवु.” त्यानंतर तो म्हणाला की, “मी तुमची गाडी चालवितो, तुम्ही शेजारी बसा, ग्रामसेवक यांना विकास गायकवाड याचे शेजारी बसले, तेव्हा त्याने हातातील मोबाईल काढुन त्याचेकडे घेतला. तसेच दुचाकीवरील दोन्ही लोक गाडीत मागील सिटवर बसले विकास गायकवाड याने गाडी वळवून घेतली आणि गाडी जिल्हा परिषद शाळा, कुडजेचे जवळ असलेल्या दगडे फॉर्म हाऊस येथे नेऊन थांबविली. तेव्हा ग्रामसेवक यांनी विकासला “गाडी येथे का आणली?” असे विचारले असता, “आपण येथे बसुन मिटवुन घेऊ, “असे म्हणुन त्याने गाडीतून उतरुन त्याचेकडील चावीने दगडे फार्मचा दरवाजा उघडला. आम्ही जीन्याने दुस-या मजल्यावर गेलो. तेथे खुप धुळ होती. त्यावरून ते विकासला म्हणालो की, येथे बसयला जागा नाही, आपण येथे कसे बसणार यावर तो म्हणाला की, “आता मादरचोद भाऊसाहेब तुम्ही माझे ऐकायचे, तुमच्यावर माझी गेले दीड महीन्या पासुन पाळत आहे, तुम्ही कुठे जात, कोठुन घरी जाता, कसे येता यावर मी लक्ष ठेऊन आहे, “तेव्हा त्याला “तु माझेवर का लक्ष ठेवतो आहेस?” असे विचारले असता, तो म्हणाला की, ” भाडखाऊ तुम्ही मला पाच लाख रु. आत्ता द्यायचे नाहीतर येथेच विष पिऊन आत्महत्या करायची. आपले गावात रस्त्याची गटारांची खुप कामे झाली आहेत, “यावर मी त्यांना ग्रामसेवक की, “त्या कामांशी ग्रामसेवकाचा काहीही संबंध येत नाही. “त्यावर तो म्हणाला की, “आईघाल्या मला त्याचेशी काहीही घेणे-देणे नाही, तुम्हांला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही मला पाच पेटी द्यायचे” असे म्हणाला “तुम्ही पैश्याची अध्य तासात जमवा जमव कर नाहीतर तुमचा विषय येथेच संपवुन टाकतो, तुमची शेवटची इच्छा काय ते सांगा?” असे म्हणाला. ग्रामसेवक यांनी त्यांची खुप विनवणी करित होतो. पण ते ऐकत नव्हते. त्या दरम्यान ते दोन अनोळखी इसम तेथुन खाली गेले व काही वेळाने परत आले, त्यांचे हातात वडापाव होते. त्यांनी वडापाव गामसेवक जबरदस्तीने खाण्यास दिले. माझा वडापाव खाऊन झाल्यावर त्या तिघांनी तेथे असलेल्या दोरीने त्या तिघांनी मिळुन ग्रामसेवक यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय बांधले व तेथेच असलेल्या सोफ्यावर झोपविले आणि एक दोरी माझ्या गळ्याला बांधुन ती एका लोखंडी अँगलला बांधुन डांबुन ठेवले होते. विकास गायकवाड याने “तुम्ही जर येथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला तर बाहेर माझे आणखी लोक थांबले आहेत. ते तुम्हांला मारतील. मला नवनाथ निढाळकर यांचा पुर्ण पाठींबा आहे, तुला ग्रामसेवाकाचे जे करायचे ते कर असे त्याने मला सांगितले आहे. “त्यानंतर विकास याने खिशातून एक छोटी प्लॅस्टिकची बाटली काढली व म्हणाला की, “यात एकदम जहाल विष आहे, ते पिल्यावर तुमचा खेळ खलास होईल, तुम्ही तुमच्या हाताने ते प्या, “असे म्हणत माझे तोडावर ओतत असताना मी हात मध्ये घातला. तेव्हा त्या बाटलीमधील द्रव माझे हातावर व खाली पडले. त्यानंतर विकास गायकवाड याने मला मृत्युची भिती दाखवुन तुमच्याकडे फोन पे मध्ये किती पैसे आहेत असे विचारना करुन माझे मोबाईलचा व फोन पे चा पासवर्ड जबरदस्तीने विचारुन घेतला आणि माझे फोन पेचा वापर करुन त्याने माझे खात्यात असलेली 49,000/- रु. रक्कम त्याचे खात्यात वर्ग करून घेतली. तसेच “तुमच्या मित्रांकडुन पैसे मागुन घ्या ” असे म्हणाला. तेव्हा ग्रामसेवक यांचे मित्र संदीप धोत्रे यांना फोन लावला, तो फोन विकासने लाऊड स्पिकरवर ठेवला होता. संदीपकडे पैश्याची अडचण आहे असे सांगुन पैसे मागितले, त्याने फोन पे व्दारे माझे खात्यात 24,000/- रु. रक्कम पाठविली. ती विकास याने लगेच त्याचे फोन पे वर ट्रान्स्फर करुन घेतली. संदीप धोत्रे यांना फोन लावणेपुर्वी विकासने मला धमकी दिली की, “त्याला काही सांगितले, तर तुमचा खेळ लगेच खल्लास होईल”, त्यामुळे मी घाबरून संदीपला काही सांगितले नाही.

  .ग्रामसेवक खाडे यांनी फिर्यादी मधे म्हटले आहे की,विकासने सांगितले की, आता मी तुझे मोबाईल वरून माझे मोबाईल नंबर वर फोन लावतो, त्यावेळी तु असे बोलायचे की, “तुमचा अर्ज आहे, म्हणून मी तुम्हाला पैसे पाठविले आहेत, तुम्ही काय आहे ते मिटवून घ्या, मी खुप भ्रष्टाचारी आहे. त्यातील पैस तुम्हाला दिले आहेते. “पण मी त्याला म्हणालो की, “मी हे बोलणार नाही तुम्ही माझा जीव घ्या.’ त्यानंतर विकास गायकवाड याने त्याचे मोबाईल वरून एका इसमाला व्हीडीओ कॉल केला होता. तो इसम माझेशी बोलला, तो इसम विकास गायकवाड याचा मित्र होता. त्याने देखील मला सोडुन देणेबाबत विकासला विनंती केली होती. पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. परंतु काही वेळाने ते दोन अनोळखी इसम तेथुन निघून गेले. त्याचेनंतर विकासने माझे हातपाय सोडले व मला खाली घेऊन आला. तेव्हा रात्रीचे 11.30 वाजले होते. विकासने मला सांगितले की, “आता तुमची कार माझेकडे राहील, तुम्ही मला दीड लाख रु. आणुन दिल्यावर मी ती तुम्हाला परत देईन, पैसे नाही दिले तर तुमच्या सकट तुमच्या कुटुंबाला देखील संपवुन टाकेन, तुम्ही माझी अॅक्टीव्हा घेऊन जा”, असे म्हणुन मल बंगल्याचे बाहेर घेऊन आला, तेथे त्याने मला अॅक्टीव्ही क्र. MH12/PU/ 0466 ही दिली. तेव्हा तेथे तीन अनोळखी इसम उभे होते. विकासने त्यांना सांगितले की, “आमचेत गैरसमज झाले होते म्हणुन मी त्यांना घेऊन आलो होतो. तसेच मी तुम्हांला उत्तमनगर पर्यंत सोडतो असे सांगुन त्याने गाडी माझे पाठीमागे घेतली होती आम्ही मुख्य रस्त्याला आलो असताना तेथे मला कूडजे गावातील गौरव पायगुडे हा दिसला. त्याने माझेकडे “भाऊसाहेब एवढे रात्री काय करता?” असे विचारले होते, पण मी घाबरून त्याला काहीही सांगितले नाही. कमळा मंदीरा पाशी आल्यावर विकासने गाडी माझे गाडीचे पुढे नेली व नंतर तो दिसेनासा झाला. मी तेथुन माझे घरी गेलो. माझा फोन व गाडी विकास हा घेऊन गेला होता. साधारण रात्री 1.30 वा. चे सुमारास माझे पत्नीचे मोबाईलवर पोलीसांचा फोन आला व त्यांनी माझे गाडी व मोबाईलबाबत विचारणा केली असता, त्यांनी मी घडलेली हकीकत थोडक्यात सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, माझी गाडी फोन व आणखी एक फोन सिहंगड सृष्टी येथे सापडलेला आहे. मी झालेल्या घटनेने खुप भयभीत झालो होतो, त्यामुळे मी उद्या येतो असे सांगितले. त्यानंतर मी माझे मित्र, नातेवाईक यांचेशी चर्चा करुन आज रोजी तक्रार देणेस आलो आहे. माझे फोन पे मधुन विकास गायकवा याचे खात्यात वर्ग झालेल्या रकमेचा तपशिल देण्यात आला आहे . पुणे खडकवासला येथील उत्तमनगर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक दादाराजे पवार हे करीत आहेत .
यातील विकास प्रकाश गायकवाड हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी ( मोका ) अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ यांनी केली आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page