कवठे येमाई दि. २७ (वृत्तसेवा ) – ऐतिहासिक महत्व असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात अनेक डांबरी,पक्के रस्ते झाले. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित राहिलेल्या कवठे गावठाण (राजवाडा) ते लाखणगाव रस्त्याला जोडणारासुमारे १२५ मीटर लांब व ३ मीटर रुंदीच्या कच्चा रस्त्याच्या कामाला आज अखेर मुहूर्त सापडला.जिल्हा परिषदेच्या ३० / ५४ ग्रामीण रस्ते निधीतून या रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रुपये निधी टाकण्यात आला असून आज मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे,शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, सरपंच सुनिता पोकळे,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, माजी सरपंच बी.एम.पोकळे,रामदास सांडभोर,अरूण मुंजाल,बाळासाहेब डांगे,सोसायटीचे अध्यक्ष विक्रम इचके, बबुशा पाटील कांदळकर,फक्कड सांडभोर,पोपट रोहिले,कैलास बच्चे,बाळासाहेब दत्तु इचके,एकनाथ सांडभोर,रितेश शहा,भाऊसाहेब घोडे, मिठूलाल बाफना, काशिनाथ पोकळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव, मधुकर रोकडे, राजेंद्र इचके, पांडुरंग भोर, सचिन बोऱ्हाडे,बाळशिराम मुंजाळ, किसनराव हिलाळ, निलेश पोकळे,गणेश रत्नपारखी,जानकु मुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे व ग्रामस्थ उपस्थित होते. हा दुर्लक्षित रस्ता चांगला व मजबूत व्हावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यर्थ होत आहे.
या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे म्हणाल्या की जिल्हा परीषद व आमदार दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमा मधुन कवठे परीसरात मोठ्या प्रमानात निधी देऊन विविध कामे सुरु आहेत .