नवनाथ रणपिसे
पिंपरखेड (वृत्तसेवा ) : विध्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल राहणे गरजेचे असुन पोलिस दलात उत्कृष्ठ अधिकारी निर्माण करण्यांची गावची परंपरा कायम ठेवत आदर्श काम करा, प्रतिपादन शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
पिंपरखेड ता. शिरूर येथील पोलीस दलात पाच विद्यार्थी भरती झाल्याने ग्रामपंचायत पिंपरखेडच्या वतीने त्यांचा भव्य माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरखेडचे पोलिस दलात भरती झालेले सचिन सोपान बोंबे, पुणे ग्रामीण,सागर पंढरीनाथ दाभाडे लोहमार्ग पोलीस पुणे, प्रांजल पोखरकर पुणे ग्रामीण, राहुल दाभाडे लोहमार्ग पोलीस पुणे,अश्विनी नवनाथ रणपिसे पुणे ग्रामीण ह्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, चेअरमन किरण ढोमे, अखिलेश कुमार (शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र ),पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, भाऊसाहेब बोंबे, माजी सरपंच दामोदर दाभाडे, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, माजी उपसभापती बाळशीराम ढोमे, ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, रामदास ढोमे, माऊली ढोमे, गौरेश दरेकर, जयवंत बोंबे, आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार पोपटराव गावडे पुढे बोलताना म्हणाले की, भरती झालेल्या विदयार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने यापुढील काळात देशसेवेसाठी काम करणे गरजेचे आहे. या गावची पोलिस दलात मोठे नाव असुन ते सदैव रोषन झाले पाहीजे . यावेळी सुरेशकुमार राऊत म्हणाले की, या पुढील काळात समाजासाठी काम करा ,जनतेचे प्रश्न सोडवा कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच दामोदर दाभाडे यांनी तर आभार सागर बोंबे यांनी मानले.