गुन्हेपुणेपुणे जिल्हा

वाघोलीत डंपरची दुचाकीला जोरदार धडक..! निवृत्त पोलिसासह पत्नीचा जागेवरच मृत्यू

पुणे नगर रस्त्यावर होतेय प्रचंड वाहतुक कोंडी - चौकात नसतात पोलिस

वाघोली : ( वृत्तसेवा ) : पुणे नगर रस्त्यावर वाघोली येथे एका डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला असुन आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या डंपरने काही अंतरापर्यंत दुचाकीसह दाम्पत्याला फरफटत पुढे नेण्यात आले .

      अशोक मार्तंड काळे व वर्षा अशोक काळे अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर डंपर  चालक भास्कर पंढरीनाथ कंद हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक काळे आणि त्यांची पत्नी हे रस्त्यावरून वाळकी या त्यांच्या गावी कामानिमित्त चालले होते. वाघोली येथील केसनंद फाट्याकडे ते वळत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरात धडक देत काही अंतर फरफटत नेले. त्यात दुचाकी त्या डंपरमध्ये अडकली होती. दोघेही चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या.शरीराच्या पूर्ण चेंदामेंदा झाला होता. प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे उभे राहिले. भर चौकात हा अपघात झाल्याने काही वेळ या भागात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या अपघाताने काळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठवून देत वाहतुकीची कोंडी सुरळीत केली.

अशोक काळे हे पोलिस सेवेतून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले होते तर त्यांच्या पत्नी या गृहिणी होत्या. त्यांनी निवृत्तीनंतर शेतीकडे लक्ष देण्यात सुरुवात.केली होती अशी माहिती समोर आली असून त्यांना दोन मुले असल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलिस करत आहेत. पुणे नगर रस्त्यावर वाघोली, शिक्रापुर पेरणेफाटा, कोरेगाव भिमा या चौकात मोठ्या प्रमानात वाहतुक कोंडी होते . त्याकडे  पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत असुन, वाळु, खडी, वाहतुक करणारे डंपर अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने वाहने चालवत असतात त्यामुळेच अश्या प्रकारे नाहक लोकाचे प्राण जात असुन, अनेक अपघात होत आहेत .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page