गुन्हेपुणेपुणे जिल्हा

लहान बालकांच्या खुनास जबाबदार असलेला आरोपीस केले जेरबंद

पिंपरी चिंचवड युनिट तीन च्या पोलिस पथकांची कारवाई

पिंपरी चिंचवड (वृत्तसेवा ) :
शेल पिंपळगाव चाकण जि पुणे पोलीस स्टेशन हददीतील लहान बालकाच्या खुनाचे गुन्हयातील फरार आरोपीस पिंपरीचिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ कडुन२४ तासाचे आतगजाआड करण्यात यश आले आहे

     दिनांक ०६/०४/२०२३ रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास चाकण पोलीस ठाणे हददीत मौजे शेलपिंपळगाव येथे लग्नास नकार दिल्याचे कारणा वरन फिर्यादी आरती हंसराज मराठे यांचा सव्वा वर्षाच्या मुलास आरोपी  विक्रम शरद कोळेकर याने बाथरूम मध्ये गरम पाण्याचे बादली मध्ये बुडवील्याने त्या मध्यो लहान बालक गंभिररित्या भाजल्याने त्याचेवर ससुन हॉस्पीटल, पुणे या ठिकाणी उपचार चालु असताना दिनांक १८/०४/२०२३ रोजी मयत झाल्याने फिर्यादीने चाकण पो.स्टे. गु.र.नं. ३९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२,५०६ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

   चाकण पोलीस स्टेशन हददीतील शेलपिंपळगाव येथील लहान बालकाच्या खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने त्यातील आरोपीस तात्काळ ताब्यातघेणे बाबत गुन्हे शाखा युनिट ३, कडील वपोनि शैलेश गायकवाड यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेउन सदरचा गुन्हा उघडकीस आणने बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या

श्री शैलेश गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांनी दोन वेगवेगळया टिम तयार करून योग्यत्या सुचना देउन एक टिम मध्येते स्वतः सोबत पो.ना भालचिम, पो.शि दांगट, पो.शि. रामदास मेरगळ, पो. शि. नांगरे असे आरोपी रहात असलेल्या कोयाळी परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होते व दुस-या टिम मधील पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पो.हवा आढारी, पो.शि कोळेकर, पो.शि.  फापाळे, पोशि २८८३ काळे असे बहुळ चाकण परिसरात पाठवुन सदर आरोपीचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे टिमला बातमी मिळाली की, सदरचा आरोपी हा बहुळ परिसरात येणार असले बाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांनी दुसरी टिम कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने सदर आरोपीची वैदयकीय तपासनी करू न आरोपीस रिपोर्टसह चाकण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.

बहुळ परिसराचे जवळच असल्याने त्या टिमला तात्काळ सदर ठिकाणी पाठवुन सापळा रचुन आरोपी विक्रम शरद कोळेकर वय २३ वर्षे रा. कोयाळी ता.खेड जि.पुणे यास शिताफीने ताब्यात घेउन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने

 सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती. स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे अतिरीक्त कार्यभार) श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार- यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिम, ऋषीकेश भोसुरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समिर काळे, निखल फापाळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनमंते, राहुल सुर्यवंशी यांनी केली आहे. अशी माहीती पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page