पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईसामाजिक

जेष्ठ पत्रकार के डी गव्हाणे यांचे निधन

गेली महीनाभर सुरू होती मृत्युशी झुंज

कोरेगाव भिमा : ( वृत्तसेवा ) : कोरेगाव भिमा ता शिरूर जि पुणे येथील जेष्ठ पत्रकार के डी ( भाऊ ) गव्हाणे यांचे आज निधन झाले .
गेल्या एक महीन्या पूर्वी पुणे नगर रस्त्यावर पुणे येथुन येताना रात्रीच्या वेळेस लोणीकंद परीसरात त्यांच्या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली होती .त्यामधे खाली पडल्यांने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला . त्यांना तेथुन वाघोली येथे खाजगी हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आले . तेथुन आमदार अशोक पवार यांनी लक्ष देत मदत करीत पुण्यात रुबी हॉस्पिटल मधे दाखल केले होते . तेथे गेली महीनाभर उपचार सुरु होते .गुरुवारी सकाळी अचानक तब्बेत बिघडली व त्यांचे निधन झाल्याचे रुबी प्रशासनाने सांगितले . त्यांच्या पाठीमागे एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे . के .डी गव्हाणे हे गेली ३० वर्षे शिरूर हवेली तालुक्यात विविध वर्तमान पत्रामधुन पत्रकारीता करीत समाज जागृतीचे काम केले . विध्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या सुयश दिनदर्शिकेचे संपादक होते .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page