शिरूर : ( वृत्तसेवा )
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महाराजस्व अभियानाअंतर्गत सातशे ९७ पैकी चारशे ४५ नोंदी वर कार्यवाही करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यांचे काम उपविभागिय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते यांच्या मार्गदर्शना खाली महसुल प्रशासनाने केले असुन गेली वर्षभर सुस्त झालेले प्रशासन प्रांत अधिकारी यांच्या झटपट निर्णय क्षमतेमुळे कामाला गती आली असुन नागरीकां मधे समाधान व्यक्त केले जात आहे .
याबाबत उपविभागिय अधिकारि स्नेह किसवे – देवकाते म्हणाल्या की, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी महाराजस्व अभियान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत ,याकरीता तहसिल व मंडळ स्तरावर फेरफार अदालत आयोजित करण्यात आल्या . शिरूर रांजणगाव गणपती ,टाकळी हाजी मलठण, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा, वडगाव रासाई या मंडला मधे आयोजित केल्या .
या मधे प्रलंबित असलेल्या ७९७ फेरफार नोंदीपैकी दि. १२ एप्रिल पर्यन्त रोजी ४४५ फेरफार नोंदी पुर्ण करुन त्याचे प्रत्यक्ष लाभ नागरीकांना देणेत आलेले आहेत. या फेरफार अदालत कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद देवून व प्रशासनाचा पारदर्शक कार्यक्रम पाहून समाधान व्यक्त केले आहे. तसेच महसूल प्रशासनाने शिरुर तालुक्यामध्ये फेरफार अदालत कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करुन त्याच दिवशी ७/१२ व फेरफार वितरण केल्यामुळे नागरीकांमध्ये शासनाप्रति जिव्हाळयाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. फेरफार अदालत कार्यक्रमाचे सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी दिवसभर कामे मार्गी लावले .
या वेळी उपविभागिय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, तहशिलदार बालाजी सोमवंशी कार्यक्रमास उपस्थित राहिले असून त्यांनी तालुकांतर्गत सर्व कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला .तसेच श्रीमती. स्नेहा किसवे देवकाते, यांनी यापुढेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन लोकाभिमुख पारदर्शक प्रशासकीय कामकाज करणार
मुलांचे शाळा सुरु होण्यापुर्वी उत्पन्न व जातीचे दाखले वाटप करण्यात येणार असल्यांचे सांगितले .
याबाबत शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य वसुदेव जोरी म्हणाले की , प्रांत अधिकारी यांच्या झटपट निर्णय क्षमतेमुळे जनतेचे कामे मार्गी लागत असुन, फेरफार अदालती मधे अनेक प्रलंबित कामे झाली आहेत .