पर्यटनपुणेपुणे जिल्हामनोरंजनमुंबईसामाजिक

टाकळी हाजी – निघोजच्या मळगंगा देवी यात्रा उत्सहास सुरवात

तीन दिवस लाखो भाविकांच्या गर्दीने फुलणार परीसर

श्री संजय बारहाते – शिरूर

  टाकळी हाजी – निघोजच्या जागृत देवी असलेल्या माता मळगंगा देवीचा यात्रा उत्सव गुरुवार दि १२ पासुन सुरु होत असुन, शुक्रवार दि १३ शनिवार दि १४ असे तीन दिवस हा उत्सव रंगत असुन, संपुर्ण महाराष्ट्रा मधुन लाखो भक्तांचा महापुर येथे ओसांडुन वाहत, दोन जिल्ह्यातील दोन तालुक्यातील दोन गावे शेकडो वर्षापासुन एक दिलाने ही यात्रा भरवित आहेत .
टाकळी हाजी ता शिरूर व निघोज ता पारनेर या पुणे नगर जिल्ह्यांच्या सिमेवर जागृत तिर्थ व पर्यटन क्षेत्र असलेल्या श्री मळगंगा देवीचा यात्रा उत्सव दोन्ही तालुक्यातील भाविक भक्ता बरोबरच आबाल वृद्धांना पर्वणी ठरणारा असा असुन लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करीत असतात .
मळगंगा देवीच्या यात्रेची ओढ परीसरातील पंचक्रोशी मधील माणसांना लागलेली असते . दोन्ही तालुक्यातील ही मोठी यात्रा असते .
नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात फक्त असून नवरात्र उत्सव व यात्रेच्या काळात हे भक्तगण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात .पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते या नदीच्या काठावर जगप्रसिद्ध अशी रांजण खळगे असून त्याला ऐतिहासिक धार्मिक व भौगोलिक दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे .धार्मिक दृष्टिकोनातून हे रांजणखळगे देवीच्या घोड्याच्या पावलांमुळे तयार झाल्याची आख्यायिका सांगितली जाते . येथे पाळणा सोडल्याने अनेकांच्या संसाराचा पाळणा हालतो अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे येथे भाविक नवस करणे तसेच नवस पुर्ती झाल्यावर तो फेडण्यासाठी गर्दी करीत असतात .निघोज ता पारनेर येथे असलेल्या पुरातन बारावे मध्ये देवी भक्तांना घागरीच्या रूपाने दर्शन देते .हे दर्शन घेण्यासाठी मंगळवार दिनांक १२ रोजी रात्रीच भाविक मोठ्या प्रमाणात निघोज गावात दर्शन साठ गर्दी करतात . शुक्रवार दि १३ रोजी सकाळी ही घागर पायरीवर आल्यावर तेथुन पुजारी डोक्यावर घेऊन पालखी काठ्यासह सवांद्य मिरवणुकी काढत पुन्हा बारवेत सोडण्यात येते . देवी घागरीच्या रुपाने भक्तांना दर्शन देते अशी श्रद्धा असल्यांने राज्यभरातुन लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात .दुपारी जगप्रसिद्ध रांजण खळगे कुंड येथील मंदीकडे टाकळी हाजी व निघोज गावचे ग्रामस्थ पालख्या सासन काठ्या घेऊन कुंडावर येतात . सनई चौघड्यांचा गणनभेदी आवाज, कडकडाट करणारी हलगी भाविकांना देहभान विसरून भक्तीरसात बाया बापडे अबाल वृद्ध मळगंगा माते की जय या जयघोषात तल्लीन होऊन जातात . संध्याकाळी ६ वाजता नाचत नाचत मंदीराकडे वाटचाल करीत येतात .

भौगिलिक महत्व ..
टाकळी हाजी ता शिरूर व निघोज ता पारनेर च्या सरहदहीवरून वाहणाऱ्या कुकडी नदीच्या पात्रात असंख्य रांजणखळगे पाहायला मिळतात. गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे या रांजणखळेची एक आश्चर्य म्हणुन नोंद असुन येथे विविध शास्त्रज्ञ , भुगोल अभ्यासक वर्षभर भेट देत असतात. शालेय अभ्यास क्रमातही या ठिकानांची माहीती आहे. त्यामुळे शालेय मुलांच्या सहली वर्षभर येत असतात.
माजी आमदार पोपटराव गावडे यांनी प्रयत्न करीत येथे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी मुळे पर्यटना बरोबरचं तिर्थ स्थळाचा दर्जा दिला आहे. पावसाळ्या मधे कुकडी नदीला पाणी सुरु झाले की अंत्यत निसर्ग रम्य परीसर, काळया पाषाण खडकातील प्रचंड मोठया दरी रांजणखळग्यांच्या असंख्य कलाकृतीचा उत्कृष्ठ नमुना येथे आपणाला दिसतो. या रांजणखळग्यावर झुलता पुल असुन, पुलांच्या मध्यभागी थांबुन या महाकाय , मनमोहक, रांजणखळग्यांचे दर्शन घडते. दरवर्षी पावसाळ्यात पुणे, मुंबई, नगर येथुन घेण्यासाठी मोठ्या प्रमानात पर्यटक येतात .

यात्रेनिमित्ताने कार्यक्रम

गुरुवार दि १२ रोजी टाकळी हाजी व निघोज गावात सासनकाठ्यांची भव्य मिरवणुक असते अनेक गावातील ढोल लेझीम पथके सहभागी होतात .
शुक्रवार दि १३ रोजी पहाटे निघोज गावात बारवे मधुन निघालेल्या घागरीची मिरवणुक सकाळी ११ वाजे पर्यन्त चालते .
दुपारी टाकळी हाजी ता शिरूर ग्रामस्थाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहेत .
सांयकाळी दोन्ही गावातुन येणाऱ्या सासनकाठ्या व पालखी मिरवणुक कुंडावर येतात तर रात्री टाकळी ग्रामस्थ यांच्या वतीने लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे .

शनिवार दि १४ रोजी कुंड पर्यटन व तिर्थस्थळावर निघोज ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचा आखाडा होणार असुन या मधे राज्यभरातील नामांकीत मल्ल सहभागी होतात . पैलवानाना लाखो रुपयांची बक्षिसरूपी बिदागी दिली जाते. तसेच या दिवसी बाजार यात्रा असते येथे शेती उपयोगी साहीत्य, भांडी यांची दुकाने लागतात . त्यामधे शेतकरी आवश्यक वस्तु घेतात .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page