शिरूर (वृत्तसेवा ) : जिद्द मेहनत सारं काही तुझ्यात आहे .. वाळवंटातही बाग फुलविण्याची हिम्मत तुझ्यात आहे .या कविते प्रमाने जिद्दीच्या जोरावर चांडोह ता शिरूर येथील तुषार – भाग्यश्री पती पत्नीने एकाच वेळी पोलिस भरतीच्या मेरीट लिस्ट मधे येत नव तरुणांना आदर्श निर्माण करून दिला आहे . सगळी कडे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. काबाड कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र हे सर्व करत असताना शिरूर तालुक्यातील नवरा बायकोने पोलिस भरतीमध्ये जाण्याचा घेतलेला ध्यास. त्यांना कुटुंबाने दिलेली साथ याचे फलित मिळाले आहे. कारण शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि नवरा बायको पोलिस भरतीसाठी निवड झाली. या आनंदात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आपला पोलिस भरतीचा आनंद साजरा केला. यावेळी यांच्या आई वडिलांच्या.डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले.
शिरूर तालुक्यातील चांडोह येथे राहणारे शेलार कुटुंब. येथील माजी सरपंच कुसुमताई म्हातरबा शेलार यांचा मुलगा तुषार आणि सून भाग्यश्री हे दोघेही पोलिसात भरती झाल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद उत्सव साजरा केला.
तुषार शेलार त्यांची आई कुसूम शेलार ही पाच वर्ष सरपंच म्हणून त्यांनी अनेक विविध विकास कामात मोलास सहकार्य केले आहे. तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा दोन वर्षापुर्वी मोठ्या थाटात पार पडला. दोघांनीही फक्त पोलिसात भरती व्हायचे अशी शपथच घेतली होती. या दोघांनाही पोलिस भरतीचे वेध लागले होते. तुषार आणि भाग्यश्री यांनी गेल्या चार वर्षांपासून पोलिस भरतीसाठी लक्ष केंद्रित केले होते. दररोज व्यायाम, शेतात असणारे घर आणि शेतीतील काम हे नेहमीचेच होते. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावे लागले. मात्र त्याचे चीज झाल्याची भावना तुषार याने व्यक्त केली आहे. या जोडप्याच्या कष्टाला यशाचे फळ लागले आहे. त्यामुळे निकाल लागल्यावर पतीने या पत्निला खांद्यावर उचलून घेऊन आनंद व्यक्त केला.
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना भाग्यश्री शेलार यांनी सांगितले की, सासरी नांदायला आल्यावर सासूने मुलीप्रमाणे अन जाऊने बहिणी प्रमाणे वागणूक दिली. सासरे अन भायाने खुप सहकार्य केले. दररोज चा व्यायाम व अभ्यास या परीक्षेसाठी कामी आला. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले आहे. आई अन वडीलांच्या आर्शीर्वादाने पोलिस दलात भरती झाले. तुषार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आई, वडील व भाऊ, वहीनी च्या आर्शिवादाने हे यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात चार वेळा या भरतीसाठी पळालो. अखेर या वर्षी हे यश मिळवता आले. यासाठी पत्नी भाग्यश्री ने मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही दोघेही पोलिस भरती झालो. भविष्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढेल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. पोलिस दलातील भरतीमुळे खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवन सुरू झाले असल्याची भावना त्याने व्यक्त केली.