शिरूर : ( वृत्तसेवा ) :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे सर्वसामान्य कुंटुबातील एक त्यागी नेतृत्व असुन,मोठ्या पक्षात फक्त प्रस्थापितांच्या मुलांना राजकारणात संधी मिळते ,मात्र सामान्य घरातील तरुण नेतृत्वाला संधी फक्त महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षातुन देत नेतृत्व घडवितात , ते कार्यकर्ता घडविणारे विद्यापिठ आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व शिरूर लोकसभा प्रभारी सचिन गुरव यांनी व्यक्त केले .
शिरूर जि पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता . या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व शिरूर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे शहर महिला अध्यक्षा सुनिता किरवे, उपाध्यक्ष वैशाली जाधव ,युवती पुणे शहराध्यक्ष शामल कसबे, शोभा साळुंखे, विजया भिकोले,शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, रासपाचे शिरूर लोकसभा अध्यक्ष रामकृष्ण बिडगर,शहराध्यक्ष सिंकदर पटेल, सोशल मिडीयाचे लक्ष्मण ठोंबरे, हनुमंत कु-हाडे, उपाध्यक्ष राजेंद्र थोरात, राजेंद्र पुणेकर, रतन बिडकर, युवती अध्यक्षा अँन्ड अपेक्षा कु-हाडे, भिमराज करे,यांच्यासह मोठ्या प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते .
या वेळी गुरव म्हणाले की, महादेव जानकर यांनी विधान सभेत विद्यार्थी नोकरदार यांची जात पडताळणीचा प्रश्न, विज कर्मचारी प्रश्न, धनगर समाजातील अनेक प्रश्न, शेतमालाचा बाजारभाव , उजणीचा प्रदुषीत पाणी या सारख्या अनेक प्रश्नावर सतत आवाज उठवला असुन अनेक प्रश्न मार्गी लावण्यांचे काम त्यांनी केले आहे .
या वेळी जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर म्हणाले की, अंत्यत साधी राहणी व उच्च विचार सरणी असलेले नेतृत्व महादेव जानकर यांच्या रुपाने बहुजन समाजाला मिळाले असुन महाराष्ट्रा बरोबरचं गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ,कर्नाटक, केरळ , तेंलगणा राज्यात पक्षाचा विस्तार झपाट्याने होत आहे .
या वेळी नवनिर्वाचित शिरूर लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण बिडगर म्हणाले की, बहुजन समाजाला राजकारण शिक्षण समाज कारण या प्रवाहात आणण्यासाठी महादेव जानकर यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता गेली ३५ वर्षे समाजासाठी डोंगर दर्यात हिंडुन करीत असलेले कार्ये समाज कधीच विसरू शकत नाही . त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय असुन, सत्ता दुर नाही सर्वानी एक दिलाने काम करा असे आवाहन त्यांनी केले .
या वेळी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष रामकृष्ण बिडगर, शिरूर शहराध्यक्ष चेतनाताई पिंगळे, राष्ट्रीय समाज पार्टी वकील संघटनेचे अध्यक्ष अँन्ड रतनताई पांडुळे बिडगर , उपाध्यक्ष सपना मलगुंडे, संघटक रविद्र थोरात, उपाध्यक्ष वाल्मीक करहे गट प्रमुख संजय थोरात यांचा सत्कार करण्यात आला .
प्रस्ताविक तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, सुत्रसंचालन प्राचार्य गोरक्षनाथ डुबे यांनी तर आभार शहराध्यक्ष सिंकदर पटेल यांनी मानले .