पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

संविदणे येथील भैरवनाथ यात्रा उदया पासुन सुरु

सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ यांची माहीती

टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असलेले सविंदणे तालुका शिरूर येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्सव सुरू होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे .
सविंदणे ता शिरूर येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा ५ व ६ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सविंदणे गावचे सरपंच सौ. शुभांगी विठ्ठल पडवळ व उपसरपंच श्री भोलेनाथ पडवळ यांनी दिली.
श्री भैरवनाथ देव हा अनेक लोकांचे श्रद्धास्थान असून यात्रेच्या काळात देवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे गर्दी करीत असतात . ग्रामस्थांच्या वतीने वर्षभर देवाच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते .कोवीड कालानंतर यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरत आहे .
बुधवार दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ ते ९ देव जन्माचे कीर्तन, मांडव डहाळे, श्री विवाह सोहळा, संपन्न होणार आहे . त्यानंतर
बैलांची मिरवणूक सकाळी १० ते सांय ६ पर्यन्त बैल गाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहे . बैलगाडा शर्यती साठी एकूण दोन लाख ७८ हजार ,८९२ रुपये इनाम ठेवण्यात आला आहे.नं १ च्या गाड्यास ७५,५७५, नंबर २ च्या गाड्यास ५११५१.नंबर-३ च्या गाड्यास ४११४१.नंबर ४ च्या गाड्यास३११३१.नंबर ५ च्या गाड्यास २११२१. फायनल साठी नंबर १-२१००१.नंबर २-१५००१.नंबर ३-११००१ रोख बक्षीस ठेवण्यात आलेली आहे.
रात्री ८ ते ११.शेरणी ,रात्री १२ ते ०६ देवाचा छबिना, काठ्या पालखी चा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवसी
गुरुवार दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०६ ते ०८ हनुमान जन्म उत्सव साजर करण्यात येतो . सकाळी ९ ते १२ कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजेरी चा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. या आखाड्यामध्ये राज्यभरातील अनेक नामांकित मल्ल हजेरी लावतात .

यासाठी गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बक्षीसांची उधळण पैलवान आर वर केली जाते .या कार्यक्रमासाठी पुणेकर, मुंबईकर तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच सौ शुभांगी पडवळ व उपसरपंच श्री भोलेनाथ पडवळ यांनी दिली .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page