Uncategorizedकृषीपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसामाजिक

आता पुण्यात विद्यार्थ्यांची जातपडताळणी होणार झटपट

या महीन्यात तत्काळ करा अर्ज

पुणे ( वृत्तसेवा ) : पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल या दरम्यान ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असुन, यामधे जातपडताळणी प्रकरणे झटपट मार्गी लागणार असे संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिवांनी कळविले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून, त्यासाठी जात पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. ही जात पडताळणी वेळेत न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आरक्षित कोठ्या मधून प्रवेश मिळत नाही .त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते. अनेक वेळा जात पडताळणी कार्यालयासमोर विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करून काम न झाल्याने संताप व्यक्त करीत असतात . त्यामुळे हा समता पर्व उपक्रमात जात पडताळणीचे दाखले मिळाले तर  विद्यार्थी पालक यांना दिलासा मिळणार असुन , प्रवेशासासाठी होणारी धावपळ त्रास कमी होणार आहे .

या उपक्रमात जात वैधता प्रमाणपत्रासंबंधित जलदगतीने कार्यवाही करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, पुरावे यांच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ कार्यालयात जमा करावा. ज्या जात पडताळणी अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा अर्जधारकांकरिता त्रुटी पूर्तता कार्यक्रम, कार्यशाळा, सुनावण्यांचे आयोजन, दक्षता पथकामार्फत मार्गदर्शन, जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळा त्याच बरोबर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळा, वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून जात प्रमाणपत्र मागासवर्गीय विद्यार्थाना शाळेतच उपलब्ध करून देण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांच्यावतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून नियोजन करण्यात येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शैक्षणिक योजनांपासून वंचित राहू नये हा यामागील मुख्य उद्देश असून या समता पर्व उप्रकम अंतर्गत पालक व विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे.

समता पर्व उपक्रमात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जात जिल्हा पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page