कृषीगुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्र

ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना ब्रेक झाला फेल..! तरुणाचा मृत्यु,

कांद्याला नाही भाव, पण शेतकऱ्याचा जीव जातोय की राव

शिरूर (वृत्तसेवा ) जि पुणे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला, त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने रणदिवे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

भूषण विजय रणदिवे ( वय ३१) असे अपघातात.मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृत तरुणाचा चुलत भाऊ आशुतोष दत्तात्रय रणदिवे याने न्हावरे पोलीसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव सांडस येथे रणदिवे यांचे शेत आहे. बाप लेक शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. घरी जात असताना शेतकरी तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. त्यात रस्ता उताराचा असल्याने त्यात ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून सुसाट झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण त्या ट्रॉली खाली अडकला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील देखील यात गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलगा गेल्याने रणदिवे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कांदयाला मातीमोल बाजारभाव मिळत असतानाही फक्त चारपैसै होतील या आशेवर शेतकरी उन्हातान्हात जीव धोक्यात घालुन अपार कष्ठ करताना दिसत आहे . मात्र असे संकटे आल्यास त्यांच्यासाठी आभाळ संकटाचा डोंगर कोळसत आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page