पुणेपुणे जिल्हाराजकारणसामाजिक

तिच्या प्रयत्नामुळे मिळाली सोळा महिलांना नवी दृष्टी

जागतिक महीला दिनी संविदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ यांचा नेत्र शस्त्रक्रीया उपक्रम

टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) संविदणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ यांनी जागतिक महिला दिनी मोफत नेत्र शस्त्रक्रिया उपक्रम राबवुन १६ महीलाना नवी दृष्टी देण्यांचे काम केले असुन या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
संविदणे गावच्या सरपंच पदाची जबाबदारी महीन्यापुर्वी शुभांगी विठ्ठल पडवळ या उच्च शिक्षित महिलेच्या हाती मिळाली . त्यांनी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यांचा निर्धार केला . गावातील गरीब महिलांनी त्यांच्याकडे नेत्र शस्त्रक्रीयेची मागणी केली . त्यांनी तत्काळ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सविंदणे ता शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व हेल्प एज इंडिया संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा मधून १६ महिला व पुरुष यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर, पुणे येथे करण्यात आले.
सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ यांनी पुढाकार घेऊन नेत्र तपासणी झालेल्या रुग्नांशी संपर्क करून त्यांना पुणे येथे ऑपरेशन ला जाण्यासाठी नियोजन केले. विशेष म्हणजे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रीया हे पूर्ण पणे मोफत करण्यात आली. डॉ. अश्विनी कदम, डॉ. किरण वाबळे, डॉ.निशा दिपवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शस्त्रक्रिया पार पडले.
यावेळी सरपंच सौ. शुभांगी पडवळ, उपसरपंच भोलेनाथ पडवळ, माजी सरपंच सौ. सोनाली खैरे, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे, रवी पडवळ,मालूबाई मिंडे,मनीषा नरवडे, नंदा पुंडे,रेखा भोर कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, माजी सरपंच वसंत पडवळ,मोहन किठे उपस्थित होते.
सरपंच शुभांगी पडवळ म्हणाल्या की, गावात अजुन महीला रुग्न आढळल्यास त्यांच्यावरही शस्त्रक्रीया करण्यात येईल . या शस्त्रक्रियेमुळे आम्हाला नवीन आयुष्य मिळाल्यांची भावना रुग्न महीलानी व्यक्त केली .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page