रात्रीच्या अंधारात टायर दोनदा पंक्चर झाला अन् मधे कुटुंबावर आघात झाला
जुन्नर तालुक्यातील भीषण अपघात; पारनेर तालुक्यातील येथील सर्व राहणारे
- पुणे : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पीक अपने दुचाकीवर असणाऱ्या पाच जणांना चिरडले होते. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. एकच कुटुंबातील सर्वजण गेल्याने मधे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र ज्यावेळी हे सर्वजण गेले त्यावेळी त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी देखील त्यांच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. गावच्या सरपंचाने गावातून ५०० ते हजार गोळा करून या पाच जणांचा अंत्यविधी केला. या घटनेने संपूर्ण गाव हळहळल आहे.
पारनेर तालुक्यातील पळशी या गावात मधे कुटुंब राहते. मोल मजुरी करून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालतो. जेव्हा काम.करेल तेव्हा घरात चूल पेटणार अशी परिस्थिती. त्यात आई वडिलांना दारूचे व्यसन. त्यामुळे आधार कुणाचाच नाही. गेल्या सहा महिन्यांपासून मधे हे आपल्या कुटुंबासोबत नारायणगाव येथे मोल मजुरीच्या कामाला येत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते कुटुंबासह पळशी येथे जाण्यास निघाले मात्र, त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. तेही दोनदा. त्यामुळे ते एका गाडीवर पाच जण बसले होते. आणि बाकीचे तिघेजण एका गाडीवर. रात्री साडेअकरा बाराच्या सुमारास समोरून येणारा पीक अप गाडीला ओव्हरटेक करत असताना त्या पीकअपने या पाच जणांना उडवले. दुसऱ्या गाडीवरील तिघे जन बाजूला पडले.
त्यातील दोघेजण जागेवरच मृत्युमुखी पडले आणि बाकीचे तिघेजण उपचारादरम्यान. नितीन शिवाजी मधे ( वय २२) ,सुंदराबाई रोहित मधे( वय २१), गौरव रोहित मधे ( वय ६), आर्यन यमा मधे( वय दीड वर्ष), सुहास यमा मधे ( वय २४) यांचा या अपघातात मृत्यू झाला तर अर्चना यमा मधे ( वय २२) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघाताने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या मधे कुटुंब संपूर्ण गेल्याने संपूर्ण पारनेर तालुक्यात शोककळा पसरली असून या गावाच्या सरपंचाच्या पुढाकाराने या मधे कुटुंबियांच्या मृतांना मुखाग्नी देता आला.