गुन्हेमहाराष्ट्र

पाच शेत मजुरांना चिरडले

लवणवाडी जुन्नर येथील घटना

आळेफाटा : ( वृत्तसेवा )जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे जात असणाऱ्या दुचाकीवरील आठ शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका चिमुकल्याचा आणि आणखी एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन चिमुकल्या, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील लवणवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुयातील नारायणगाव येथे शेतमजूर पारनेर तालुयातून शेत मजुरीसाठी आले होते. मजुरीची कामे उरकून ते आपल्या घरी जात होते. दुचाकीवरून ते घरी जात असताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पीकअप जीपने या आठ जणांना जोराची धडक दिली. त्यात ते चिरडले गेले. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पारनेर तालुयातील गावाला जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला. हे सर्व मजूर दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. नारायणगाव येथून शेतातील कामे आटोपून पारनेर तालुयातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. मृतांमध्ये सुंदराबाई (वय २८), गौरव मधे (वय ५), नितीन मधे (वय २५) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

नागापूरवाडीवर शोककळा -पारनेर, पळशी जवळील नागापूरवाडी येथील सर्व मृत रहिवासी आहेत. यातील एकाचे नगरला तर उर्वरितांचे आळेफाटा येथील रूग्णालयात शवविच्छेदन सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सुंदराबाई, नितीन आणि गौरव हे तिघे एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे नागापूरवाडीमध्ये शोककळा आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार दुपारी उशीरा होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page